शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ओरिएंटमध्ये 'काम बंद'

By admin | Updated: September 12, 2014 14:46 IST

नशिराबाद येथील ओरिएंट सिमेंट मधील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी सहावाजेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

जळगाव : कामगारांच्या मूलभूत मजुरी व ग्रेडेशनमध्ये वाढ करण्यात यावी यासह एकूण २९ मागण्यांसाठी नशिराबाद येथील ओरिएंट सिमेंट मधील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी सहावाजेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कामगारांची २९ मागण्यांची सनद मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा संघटनेचे उपचिटणीस मुकुंदा रोटे यांनी दिला आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ओरिएंट सिमेंटचा आंध्रप्रदेशातील देवापूर येथे उत्पादन प्रकल्प असून तेथील कामगारांना विविध सोयी सुविधा पुरविल्या जातात, त्या जळगावातील प्रकल्पात पुरविल्या जात नाही. हा दुजाभाव दूर करण्यात यावा. दरवर्षी पगारात वाढ करण्यात यावी, कामगार मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे नियमित महागाई भत्ता देण्यात यावा, घरभाडे, पर्यटन रजा व भत्ता, वैद्यकीय, शैक्षणिक, धुलाई, शिफ्ट आदी भत्ते संघटनेच्या मागणीनुसार देण्यात यावे यासह एकूण २९ मागण्या कामगारांच्या आहेत. दरम्यान, ओरिएंट सिमेंटचे व्यवस्थापक सी.व्ही. बगायत यांना विचारले असता, ते म्हणाले, कामगारांच्या ११ मागण्या आहेत, त्यापैकी आम्ही ४ मागण्या मान्य केल्या आहेत. उर्वरित मागण्यांसाठी कामगारांची आंदोलन सुरू केले आहे. नियमानुसार कामगारांना सोयी-सुविधा देण्यात येत आहे. कामगारांनी काम सुरू करावे.
------------
कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन कंपनीला महिनाभरापूर्वीच देण्यात आले होते. मात्र कोणतीही दखल अथवा चर्चेसाठी बोलाविण्यात न आल्याने ५00 कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी तीनही शिफ्टमधील काम बंद झाले आहे. - मुकुंदा रोटे, उपचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना.