शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनो आत्मशक्ती जागृत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 04:52 IST

महिला ही शक्ती आहे. मात्र आता ती कमकुवत होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील जनता आजही उपाशी आहे.

जळगाव : महिला ही शक्ती आहे. मात्र आता ती कमकुवत होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील जनता आजही उपाशी आहे. महिलांनी आपल्यातील आत्मशक्ती जागृत करून स्वत:ला सिद्ध करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भूदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या कृष्णमल जगन्नाथन यांनी महिला परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले. जळगाव येथील जैनहिल्सवरील गांधीतीर्थ येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला रविवारी सकाळी प्रारंभ झाला. गांधी रिसर्च फांउडेशनचे अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या झिल कार हरिस, पी. व्ही.राजगोपाल, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, सेवादास दलुभाऊ जैन, अनूभुती स्कूलच्या निशा जैन, मार्गारेट ट्युबलेट (स्वित्झर्लंड), आयडा गामुया (कोलंबो), सॅरिना (अमेरिका), आयरिल साडिईगो, सुमैय्या यांच्यासह देशविदेशातील सुमारे दोन हजार महिला परिषदेत सहभागी झाल्या आहेत.गांधी रिसर्च फाउंडेशन, इंटरनॅशनल गांधीयन इन्स्टिट्यूट फॉर नॉन वायसन्स अ‍ॅण्ड पीस, एकता फाउंडेशन, भोपाळ यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे. कृष्णमल जगन्नाथन म्हणाल्या, नारी शक्ती काय आहे. हे पश्चिम बंगामध्ये ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले. टाटा समुहाने नॅनो कारसाठी प्रकल्पाची उभारणी केली होती. मात्र आपल्या जमिनीच्या रक्षणासाठी तेथील महिलांनी सलग २६ दिवस आंदोलन सुरु ठेवत आपली जमीन मिळविली. या जगात अशक्य काहीच नाही. फक्त महिलांनी आपली आत्मशक्ती जागृती करावी. प्रारंभी देशविदेशातील महिलांनी सोबत आणलेली माती व्यासपीठावरील भांड्यात टाकून ‘जल, जंगल व जमिनी’ वाचविण्याचा संकल्प करण्यात आला. ही सर्व माती कृष्णमल जगन्नाथन यांच्याकडे सोपविण्यात आली. (प्रतिनिधी) ५० महिलांचा सन्मानमहिलांच्या हक्कसाठी काम करणाऱ्या देशभरातील ५० महिलांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन रितूपर्णा मोहंती यांनी तर आभार लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी मानले. अमेरिका, कॅनडा, कोलंबिया, इटली, केनिया, ब्राझिल, फिलीपीन्स, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, बांग्लादेश, कंबोडिया, जर्मनीसह, देशातील विविध राज्यांतून दीड ते दोन हजार महिला सहभागी झाल्या आहेत.जळगाव येथील जैन हिल्स येथे रविवारी आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस प्रारंभ झाला. यावेळी देश-विदेशातून आलेल्या महिलांनी आपल्या देशातील माती एका भांड्यात टाकून जल व जमीन वाचविण्याचा संकल्प केला.