शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

टारगट मुलांच्या विरोधात महिला पोलीस ठाण्यात

By admin | Updated: July 13, 2017 17:51 IST

भुसावळात गोविंद कॉलनी, सोमेश्वर कॉलनीत प्रचंड उपद्रव, घबराटीचे वातावरण

ऑनलाईन लोकमत 

भुसावळ, दि.13- भुसावळ शहरातील अनेक भागांमध्ये विशेषत: शाळा-कॉलेज परीसरात टारगट मुलांच्या त्रासामुळे  महिला व शाळकरी मुलींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. टारगट तरूणांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी महिला आणि पुरुषांनी शहर पोलीस ठाणे गाठत कारवाईची मागणी केली. पोलिसांनी तत्काळ कारवाईचे आदेश देत दिलासा दिला.
लागलीच कारवाई
महिला व पुरुषांनी व्यथा मांडताच साहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तत्काळ पोलिसांना पाठवून काही टारगट आणि रोडरोमीयोंना ताब्यात  घेतल्याची माहिती देण्यात आली.
दारू पिवून धिंगाणा
गोविंद कॉलनी व सोमेश्वर कॉलनीतील रेल्वे ड्रेनेज परीसरात टवाळखोर मुल सकाळी 6 ते रात्री 10 वाजे र्पयत सिगारेट, दारु पिवून गोंधळ घालतात. मुलींना आणून गैरकृत्य करतात. या प्रकाराला विरोध केल्यास शिवीगाळ करतात. यातील अनेक मूल राजकीय पक्षांशी संबंधित आहेत.ते नगरसेवकांचे नाव सांगून त्रास देतात,अशा तक्रारी या भागातील संतप्त महिला व पुरुषांनी केल्या आहेत.
पोलिसांची कारवाई सुरूच 
गेल्या आठ-दहा दिवसांपासून सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या पुढाकाराने शहरातील श्रीमती प.क.कोटेचा विद्यालय, श्रीमती प.क.कोटेचा  महिला महाविद्यालय आणि सेंट अॅलॉयसेस हायस्कूल, नारखेडे विद्यालय या भागात या आधीच रोडरोमीयोंवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सातत्य आहे. तरीदेखील सोमेश्वर नगर व गोविंद कॉलनी जवळील मोकळ्या जागेवर टारगटांचा उपद्रव वाढला असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
निलोत्पल यांना दिले सह्यांचे निवेदन..!
यशवंत वाघोदे, अशोक वाणी, रमेश पाटील, दत्तात्रय महाजन, गणेश महाजन, पवन टाक, के.के.नेहेते, एस.आर.भोळे, महेश पाटील, अशोक पाटील, विश्वनाथ वारके, मनीराम बोरकर, नवाज शेख, शशिकांत रायमळे यांच्यासह शेकडो महिलांच्या सह्या असलेले निवेदन सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.