शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

रुग्णवाहिकेअभावी जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये ७ तास ताटकळली प्रसूत महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:01 IST

१०२ क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही मिळाली नाही रुग्णवाहिका

ठळक मुद्देअनास्थाअखेर खाजगी वाहनाचा घ्यावा लागला आधार

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ - जिल्हा रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेला घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने ही महिला व नवजात बालक सात तास जिल्हा रुग्णलायातच ताटकळून राहिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. १०२ क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका न आल्याने अखेर खाजगी रुग्णवाहिका करून संध्याकाळी सहा वाजता या महिलेला घरी नेण्यात आले.यावल तालुक्यातील किनगाव येथील एका २७ वर्षीय महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालायात दाखल केले होते. या ठिकाणी महिलेची सिझेरियन होऊन प्रसूती झाली. त्यानंतर या महिलेला शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टी देऊन घरी पाठविण्यात येणार होते. तसे रुग्णालयाच्यावतीने महिलेला सांगण्यातही आले. मात्र घरी जाण्याची ओढ लागलेल्या या महिलेसह कुटुंबीयांना बराच वेळ ताटकळत रहावे लागले.तासन् तास फिरवाफिरव अन् नातेवाईकांचीदमछाकमहिलेला घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका आवश्यक असल्याने महिलेच्या नातेवाईकांनी १०२ क्रमांकावर संपर्क साधला. त्या वेळी सकाळी ११ वाजता रुग्णवाहिका मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र रुग्णवाहिका आलीच नाही. नातेवाईकांनी पुन्हा संपर्क साधला असता १२ वाजता रुग्णवाहिका येईल, असे सांगण्यात आले. तरीदेखील दुपारपर्यंत रुग्णवाहिका आलीच नाही. त्यामुळे चार ते पाच वेळा १०२ क्रमांकावर संपर्क साधून काहीच उपयोग न होता या कुटुंबास संध्याकाळपर्यंत केवळ प्रतीक्षाच करावी लागली. त्यामुळेप्रचंडमनस्तापझाला.नातेवाईकांनी गाठले ‘लोकमत’ कार्यालयवारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका न आल्याने त्रस्त झालेले नातेवाईक शरद कोळी यांनी संध्याकाळी ‘लोकमत’चे कार्यालय गाठून आपबिती सांगितली व रुग्णांच्या होणाऱ्या हालबद्दल आरोग्य विभागावर संताप व्यक्त केला.खाजगी रुग्णवाहिका करून पोहचले घरी१०२ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका न आल्याने अखेर शरद कोळी यांनी खाजगी रुग्णवाहिका चालकाशी संपर्क साधून रुग्णवाहिका भाड्याने घेऊन महिलेला पिलखेडा येथे माहेरी नेण्यात आले. या यासाठी या कुटुंबास एक हजार मोजावे लागले.शासकीय योजनांचा केवळ गवगवा करीत १०२ व १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सदैव तत्पर राहत असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात रुग्णांना असा प्रत्यय येत असेल तर या रुग्णवाहिकांचा काय उपयोग? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.अनेकदा कटू अनुभवयापूर्वीदेखील १०२ क्रमांकावर संपर्क साधून प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. या क्रमांकावर फोनच घेतला जात नाही, असे अनुभव आल्याचेही या पूर्वी रुग्णांनी सांगितले आहे.रुग्णवाहिका येथे उपलब्ध असतात. मात्र १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेबाबत कोणी आपल्याकडे आले नाही.- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय