शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

 जळगावात महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत मोहाडी येथील महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 22:12 IST

अमळनेर तालुक्यातील भरवस येथे नातेवाईकांकडे दुचाकीने जात असलेल्या वसंत पंडीत खैरनार (वय ६०) व त्यांच्या पत्नी मिराबाई खैरनार (वय ५२) रा.मोहाडी, ता.जळगाव या दाम्पत्याला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रकच्या टायरखाली येऊन मिराबाई खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडे सात वाजता महामार्गावर बांभोरी येथील जैन इरिगेशन या कंपनीच्या समोर झाला.

ठळक मुद्देबांभोरीजवळील घटना नातेवाईकांकडे जात असताना झाला अपघात पती जखमी

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,४ : अमळनेर तालुक्यातील भरवस येथे नातेवाईकांकडे दुचाकीने जात असलेल्या वसंत पंडीत खैरनार (वय ६०) व त्यांच्या पत्नी मिराबाई खैरनार (वय ५२) रा.मोहाडी, ता.जळगाव या दाम्पत्याला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रकच्या टायरखाली येऊन मिराबाई खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडे सात वाजता महामार्गावर बांभोरी येथील जैन इरिगेशन या कंपनीच्या समोर झाला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वसंत खैरनार व त्यांच्या पत्नी मीराबाई भरवस येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी दुचाकीने (क्र. एम.एच.१९ ए.जे.४४१७) सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडले. बांभोरीजवळ जैन इरिगेशन  कंपनीजवळ मागून आलेल्या ट्रकने (क्र.डब्यु.बी.२३ ई ९४१५) जोरदार धडक दिली. त्यात वसंत खैरनार हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले तर त्यांच्या पत्नी रस्त्यावर पडल्याने या ट्रकचे टायर त्यांच्या अंगावरुन गेले. त्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या.

पत्नीचा मृतदेह पाहून पती बेशुद्धअंगावरुन ट्रक गेल्याने मिराबाई यांच्या शरीरातील मांस बाहेर आले. ते रस्त्यावर पसरले होते. या अपघातात जखमी झालेल्या वसंत खैरनार  हा प्रकार पाहिल्यावर जागेवरच बेशुध्द पडले. दरम्यान, जैन इरिगेशन कंपनीच्या सहकाºयांनी तत्काळ पाळधी पोलिसांना घटनेची माहिती कळवून घटनास्थळ गाठले. सहायक फौजदार रमेश पाटील, किरण धमके व सुमित पाटील यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तर अपघातग्रस्त ट्रक व दुचाकी ताब्यात घेतली. दरम्यान, घटना घडल्यानंतर चालक ट्रक सोडून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.