मंजूर पाणीपुरवठा योजनेचे जलदगतीने काम सुरू न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीवरून संपूर्ण माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांनी पाणी योजनेचे काम सुरू करण्यासाठी भाग पाडतो, असा शब्द दिला. तसेच मुख्याधिकारी समीर शेख यांनी ठेकेदाराला सांगून लवकर काम सुरू करण्यासाठीचे लेखी आश्वासन दिले.
यावेळी महिला आघाडी शहराध्यक्ष प्रणिता पाटील -चौधरी, माजी नगरसेविका माला मेढे, रुख्मिणी काळे, कस्तुराबाई इंगळे, कमलबाई पाटील, रजनी भावसार, कमलबाई मोरे, गंगूबाई माळी, अलका धनगर, अनिता चांदणे, भाग्यश्री पाटील, वर्षा बढे, जयश्री अवतारे, मंदा थटार, मीनाक्षी पालवे, अर्चना माळी, उषा पवार, दुर्गाबाई तायडे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, हाजी अल्लाउद्दीन शेख, सुनील माळी, संजय जैन, अजय पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
वरणगाव येथे उपोषणात सहभागी झालेल्या महिला. (छाया : बाळू चव्हाण)