शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

आधुनिक जगतात महिला सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:29 IST

- पल्लवी मयूर

आजच्या आधुनिक जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमीकरण होताना दिसत आहे. अर्थ क्षेत्रही याला अपवाद नाही. आज जगामध्ये अनेक आर्थिक संस्थांचे नेतृत्व करताना महिला अग्रणीय आहेत. तसेच आर्थिक क्षेत्राचा पाया असलेले शेती व लहान मोठे उद्योगधंदे यांच्या मध्येही महिला अग्रभागी दिसून येतात. नुकतेच गीता गोपीनाथ या आंतरराष्टÑीय मुद्रा कोष (आयएमएफ)च्या प्रमुख इकॉनोमिस्ट म्हणून निवड झाली. ही निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सीए, सीएस व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक पदवी व पदवीत्तर परीक्षा आहे ज्याच्यामध्ये उत्तीर्ण होऊन महिला आर्थिक क्षेत्रात जाऊ शकतात व आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात.महिला जरी उच्च शिक्षण घेत आहेत, तरीही त्यांचा अर्थकारणामध्ये सहभाग हा फार कमी प्रमाणात आहे. भारतीय कुटुंबांमध्ये बहुतांश ठिकाणी स्त्री जरी अर्थाजन करत असली तरी त्याचे नियोजन पुरुषाच्या हाती असते. तसेच महिलांना कुटुंबातील आर्थिक नियोजनाबाबत (उदा. इन्शुरन्स, मेडिक्लेम, फिक्स डिपॉझीट) काहीच माहिती नसते. मग ज्यावेळी सर्व कुटुंबाचा भार स्त्रियांवर येतो तेव्हा मात्र महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दुर्दैवाने महिला सुद्धा कौटुंबिक अर्थकारणामध्ये रस घेताना दिसून येत नाही. म्हणून आज महिला दिनी सांगावेसे वाटते की, त्यांनी कौटुंबिक तसेच आपल्याशी संबंधित असलेल्या सर्व घटकांमध्ये आर्थिक दृष्ट्या रस घ्यावा. एकीकडे अरुणधत्ती भट्टाचार्य, शिखा शर्मा, उषा सुब्रमण्यम अशा अनेक स्त्रिया ह्या आर्थिक आणि बँकींग क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदावर काम करत असताना दिसतात. दुसरीकडे या देशामध्ये वीस टक्केच्या आसपास महिला सी.ए. आहेत.- पल्लवी मयूर, सीए, जळगाव