शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात रस्ते दुरुस्तीसाठी महिला व जेष्ठ नागरिक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 17:48 IST

पांडुरंगनाथ नगर परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून स्वखर्चाने मुरूम टाकून रस्ता तयार करून घेतला.

ठळक मुद्देस्वखर्चाने टाकला मुरूमपांडुरंगनाथ नगर ते पूजा कॉम्प्लेक्सपर्यंत

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील ग्रामीण भाग ओळखला जाणारा व नॅशनल हायवे क्रमांक सहा लागून असलेल्या खडका चौफुलीजवळच पांडुरंगनाथ नगर ते पूजा कॉम्प्लेक्स पर्यंत असलेला रोड एकूण पाचशे मीटर असून, या परिसरातील महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून स्वखर्चाने मुरूम टाकून हा रस्ता तयार करून घेतला.पांडुरंगनाथ नगर ते पूजा कॉम्प्लेक्सपर्यंत असलेला मुख्य रस्त्यावरील खड्ड््यांच्या व चिखल गारयाला स्थानिक नागरिक कंटाळले होते. एकूण पाचशे मीटर पर्यंत असलेल्या रस्त्याची सतत पावसामुळे अतिशय दुरवस्था झाली होती. परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत आणि नगरसेवक नगरपालिका यांच्याकडे तक्रार देऊनसुद्धा अपयश आले. याच रस्त्याचे सुरुवातीला कामाचे फलक अनावरण व पूजा करण्यात आले होते. तरीसुद्धा कामाला सुरुवात न झाल्याने परिसरातील होत असलेल्या त्रास आणि संताप करावा लागतो. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी १०० घरातून प्रत्येकी दोनशे रुपये वर्गणी करून या मार्गावर खडी, मुरूम मागवून परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी श्रमदान करून मुरूम टाकून रस्त्याला चालना दिली. याकामी हेमा मुरलीधर माळी, श्रद्धा प्रदीप माळी, वैशाली सपकाळ, विद्या पाटील, रेखा पवार, अर्चना पाटील, राधिका लोहार, रूपाली लोहार व अनेक महिला तथा ज्येष्ठ नागरिक मधुकर सोनार, अनिल महाजन, संजय सापकर, सुपडू तायडे विनोद ठाकरे, संजय पाटील, नीलेश खांडणेकर, मोहन चौधरी, देवीदास मावळे, पीतांबर चौधरी, अनिल कांबळे, प्रवीण भावसार, प्रवीणसिंग पाटील, टी.के. पाटील आदींचा सहभाग होता.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाBhusawalभुसावळ