वरणगाव, ता.भुसावळ : अहमदाबाद येथील एक महिला वादामुळे घर सोडून निघून आलली होती. ही महिला येथील जाडगाव फाट्यालगत महामार्गावर रस्त्याच्या कडेला व्याकुळपणे झाोपली होती होती . तिच्या आजूबाजूला दोन चिमुरड्या मुली खेळत होत्या. त्यावेळी वरणगावकडे येणाऱ्या स्वाभिमानी पक्षाच्या जिल्हाध्यक्षा मनिषा पाटील यांनी तिची विचारपूस करून, वरणगावचे ए.पी.आय. संदीप कुमार बोरसे यांना कळविले. बोरसे यांनी चौकशी केली असता, सदर महिला ही मुस्लीम समाजाची असल्याने, त्यांनी लागलीच सामाजिक कार्यकर्ते अन्सारी यांच्या मदतीने अहमदाबाद येथे तिला सुखरूप पाठविले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महिलेचे नाव रूबिनाबी अंन्सारी असून, तिचा पतीशी किरकोळ वाद झाल्यामुळे ती आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह संतापात घर सोडून निघून आली होती. तिला वरणगाव पो.स्टे.मध्ये आणले असता, अन्सारी यांनी या महिलेने सांगितलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील त्यांचे नातलग जुबेर मेमन यांचेशी संपर्क साधून सदर महिलेला स्वखर्चाने लक्झरी बसने तिच्या माहेरी रवाना केले. त्यामुळे तिच्या माहेरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याचे सर्व श्रेय मनिषा पाटील यांना देण्यात आले. या कामी त्यांना एपीय संदीपकुमार बोरसे, मुस्लीमभाई अन्सारी, शे.निजाम शे.कलीम, मझहर काझी, इमरान खान, शेख.बिलाल,शेख राजा इ.नी सहकार्य केले.
अहमदाबादची महिला तिच्या दोन्ही चिमुकल्या मुली व सोबत माहेरची मंडळी.