शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पैसे लांबविणाºया चोरट्याला महिलेनेच पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:00 IST

नवीन बसस्थानकात बसची प्रतिक्षा करीत असलेल्या महिलेची नजर चुकवून बॅगेतून साडे तीन हजार रुपये लांबविण्यात आले. पैसे गेल्याने हताश होऊन बसलेल्या असतानाच हा चोरटा दोन तासांनी पुन्हा नवीन सावज शोधायला आला असता तो या महिलेच्या नजरेस पडला. त्या महिलेने मोठ्या धाडसाने त्याला पकडून कानाखाली आवाज काढला नंतर लोकांच्या मदतीने पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देनवीन बसस्थानकातील घटना दुसरे सावज शोधायला आला अन् जाळ्यात अडकलाअन् दोन तासांनी आला चोरटा

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २ : नवीन बसस्थानकात बसची प्रतिक्षा करीत असलेल्या महिलेची नजर चुकवून बॅगेतून साडे तीन हजार रुपये लांबविण्यात आले. पैसे गेल्याने हताश होऊन बसलेल्या असतानाच हा चोरटा दोन तासांनी पुन्हा नवीन सावज शोधायला आला असता तो या महिलेच्या नजरेस पडला. त्या महिलेने मोठ्या धाडसाने त्याला पकडून कानाखाली आवाज काढला नंतर लोकांच्या मदतीने पोलिसांच्या स्वाधीन केले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुलोचना गणेश पारधी (रा.मुंबई, मुळ रा.पाळधी) या सोमवारी मुंबई जाण्यासाठी जामनेर बसने जळगावात आल्या होत्या. मुंबई बसला वेळ असल्याने १०.३० वाजता बसची प्रतिक्षा करीत असताना प्रफुल्ल वसंतराव देशमुख (वय ३२ रा.अकोला, ह.मु.जामनेर) हा त्यांच्याशेजारी येऊन बसला. सुलोचना यांनी डोळे लावल्याचे पाहून त्याने त्यांच्या बॅगेतील साडे तीन हजार रुपये काढले व क्षणातच तेथून गायब झाला. देशमुख या सुलोचना यांच्यासोबत असल्याच्या संशयामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने सुलोचना बॅगेची चैन उघडी दिसली.त्यांनी पैसै तपासले असता गायब झाले होते.

अन् दोन तासांनी आला चोरटापैसे चोरी झाल्याने सुलोचना पारधी या हताश झाल्या होत्या. एस.टी.चे कर्मचारी व सह प्रवाशी त्यांना धीर देत होते. दोन तास त्या जागेवरच बसून होता. ज्या महिलेचे पैसे चोरले ती महिला आता गेली असेल या हेतूने नवीन सावज शोधासाठी तो मद्याच्या नशेत बसस्थानकात आला. त्याला पाहताच या महिलेने धाव घेऊन पकडले. चोरटा असल्याचे समजल्यानंतर सह प्रवाशांनीही त्यांची मदत केली. हा गोंधळ सुरु असताना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी अल्ताफ पठाण यांनी चोरट्याला लोकांच्या तावडीतून सोडून पोलीस ठाण्यात नेले.तेथे चौकशी केली असता त्याने कबुली देत महिलेचे पैसे परत केले. महिलेने फिर्यान दिल्याने चोरट्याविरुध्द १०९  प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. देशमुख हा जामनेर येथे एका हॉटेलमध्ये कूक असल्याचे सांगण्यात आले. बसस्थानकात सातत्याने चोºया होत असतानाही पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचा आरोप गोपाळ पाटील यांनी केला.