शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीला शरीरसंबध ठेवण्यास महिलेने भाग पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:14 IST

फोटो लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ओळखीच्या महिलेनेच अठरा वर्षांच्या तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ...

फोटो

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ओळखीच्या महिलेनेच अठरा वर्षांच्या तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून महिलेच्या मदतीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना ७ एप्रिल रोजी उघडकीला आली आहे. कुटुंबीयांनी विश्वासात घेऊन पीडितेच्या फिर्यादीवरून विवेक महेंद्र मराठे (वय २०, रा. हरिविठ्ठल नगर) या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरती सचिन महाजन (रा. शहापूर, जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) हिलाही आरोपी करण्यात आले आहे.

दरम्यान, शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता मराठे याला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, तर आरतीला न्यायालयीन कोठडी सुनावली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबीयांसह राहते. तरुणीची आरती सचिन महाजन या महिलेशी ओळख होती. ७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास तरुणी एकटी घरी असताना आरती महाजन हिने विवेक मराठे याला तू आवडतेस, त्याच्याशी शारीरिक संबंध कर, नाही तर तुमचे शारीरिक संबंध झाले आहेत असे तुझ्या आई, वडिलांना खोटे सांगेन म्हणत धमकी देली. आरती हिने विवेक मराठेशी संबंध ठेवण्यास भाग पाडले, हा प्रकार कुणाला सांगितला तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांनी गुन्ह्यातील दोघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपी विवेक मराठेला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, तर संशयित आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.