शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:17 IST

फोटो लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने प्रतिभा कैलाससिंग परदेशी (४८, रा.सावदा, ता.रावेर) या महिलेचा मृत्यू ...

फोटो

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने प्रतिभा कैलाससिंग परदेशी (४८, रा.सावदा, ता.रावेर) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता मेहरुण मधील सारा हॉस्पिटलमध्ये घडली. दरम्यान, याप्रकरणी दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला.

प्रतिभा परदेशी यांचा मुलगा उद्धव व मुलगी शुभांगी यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार,आई प्रतिभा परदेशी यांना कोरोनाची लागण झाल्याने १६ मार्च रोजी सारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, त्याशिवाय कोरोनाची चाचणीही निगेटिव्ह आली होती. मात्र अधूनमधून त्यांना ऑक्सिजनची गरज भासत होती. दोन दिवसापासून वाॅर्डात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत होता. ऑक्सिजन पुरवठ्याची दोन लाईन या ठिकाणी आहेत. त्यापैकी एका लाईनचा ऑक्सिजन संपल्यानंतर दुसरी लाईन सुरु करणे अपेक्षित असते, परंतु दोन दिवसापासून एक लाईन बंद झाल्यावर दुसरी लाईन सुरू करण्यात स्टाफकडून दिरंगाई केली जात होती. असाच प्रकार मंगळवारी दुपारी घडला. आई प्रतिभा परदेशी यांना ज्या लाईनमधून ऑक्सिजन पुरवठा होत होता, ती लाईन बंद पडली. डॉक्टरांना त्याची कल्पना दिली असता त्याकडे दुर्लक्ष केले. कर्मचाऱ्यांनीही यात निष्काळजीपणा केला. दहा मिनिटं ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून आईचा मृत्यू झाल्याचा आरोप उद्धव व शुभांगी या भावंडांनी केला.

दरम्यान, डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याशिवाय पीपीई कीट किंवा मास्क याचा वापर करणे डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून टाळले जाते.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले डॉक्टर व तेथील स्टाफ यांच्याविरुद्ध जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा दोघं भावंडांनी घेतला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार वंजारी, गणेश शिरसाळे व इतर कर्मचार्‍यांनी तातडीने धाव घेतली. रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर केलेले आरोप व त्यानंतर त्यांनी केलेले खंडण यामुळे वातावरण अधिक तापले होते.

महापौर, उपमहापौर यांच्याकडून पाहणी

या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर जयश्री सुनील महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी हॉस्पिटलला भेट देऊन प्रतिभा परदेशी ज्या वॉर्डात दाखल होत्या तो वाॅर्ड तसेच ऑक्सिजन पुरवठा होणारी लाईन यासह सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांनाही नातेवाईकांनी घटनेची माहिती दिली.

महिनाभरापूर्वी पतीचा मृत्यू

प्रतिभा परदेशी यांचा मंगळवारी मृत्यू झाला. गेल्या महिन्यात २५ तारखेला पती कैलाससिंग गणपत परदेशी यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. महिनाभराच्या अंतरात पती-पत्नीचा मृत्यू झाला. त्याशिवाय याच कुटुंबातील इतर चौघांचाही कोरोनाने मृत्यू झाला. कैलाससिंग परदेशी यांची आई कुवरबाई परदेशी यांचा २२ मार्च रोजी मृत्यू झाला. भाऊ रामसिंग परदेशी यांचा ३१ मार्च रोजी तर भाऊ किशोर गणपत परदेशी यांचा २४ मार्च रोजी संगीता परदेशी यांचा २१ मार्च रोजी मृत्यू झालेला आहे. महिनाभराच्या अंतरात एकाच कुटुंबातील सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे सर्व जण ४५ ते ६५ या वयोगटातील होते.

असे आहेत परदेशी कुटुंबातील मृत्यू

२७ एप्रिल : प्रतिभा कैलाससिंग परदेशी

२५ मार्च : कैलाससिंग गणपत परदेशी

२१ मार्च : संगीता परदेशी

२२ मार्च : कुवरबाई गणपत परदेशी

२४ मार्च : किशोरसिंग गणपत परदेशी

३१ मार्च : रामसिंग गणपत परदेशी

कोट...

ऑक्सिजन पुरवठा करणारी लाईन बंद पडली. दहा मिनिटे ऑक्सिजन पुरवठा थांबला. त्यामुळे आईचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन बंद झाल्याचे स्टाफच्या निदर्शनास आणून दिले, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आईच्या मृत्यूस हॉस्पिटल प्रशासनच जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी. गेल्या महिन्यात वडिलांचा मृत्यू झाला आता आई गेली. आणखी कोणाचा बळी जाऊ नये यासाठी कारवाई झालीच पाहिजे.

- उद्धव कैलाससिंग परदेशी, प्रतिभा यांचा मुलगा