शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची दोघा मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 22:11 IST

टाकरखेडा येथील घटना

अमळनेर : आपल्या दोन लहान मुलांसह तरुण विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील टाकरखेडा येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.टाकरखेडा येथील सचिन जिजाबराव पाटील हा २१ रोजी सकाळी सहा वाजता गावातील एक तरुण मजुराला घेऊन शेतात ठिबक नळ्या टाकण्यासाठी शेतात गेला होता नंतर सात वाजेच्या त्याची पत्नी भारती (वय ३२) ही आपले लहान मुले गजानन (वय १२) व स्वामी ( वय ७) या दोन्ही मुलांना घेऊन मदतीसाठी शेतात गेली जाताना तिने जेवणाचा डबा देखील सोबत नेला होता. सकाळी साडेनऊ वाजता वीज गेल्यानंतर सर्वांनी सोबत जेवण केले अकरा वाजेनंतर सचिनने सोबत आणलेल्या मुलाला घरी जाण्यास सांगितले. मात्र तो पायी जाईल त्यापेक्षा मी तुला सोडून देतो म्हणून तो त्याला घेऊन निघाला. मात्र २०० मीटर अंतरावर गेल्यावर त्याने शेताकडे नजर मारली असताना त्याला त्याची पत्नी दोघा मुलांना घेऊन विहिरीकडे येताना दिसली त्याला वाटले की, पत्नीला देखील घरी यायचे आहे म्हणून तो वाट पाहत उभा राहिला. नंतर झाडाआड ते दिसले नाहीत. म्हणून बघायला गेला असता त्याला तिघे विहिरीत पडलेले दिसले. तेथेच त्याने आक्रोश सुरू केला. आजूबाजूला दोर व काहीच सुविधा नसल्याने गावातील लोकांना बोलावण्यात आले. सरपंच मंगलाबाई पाटील , पोलीस पाटील कविता पाटील यांच्यासह गावातील लोक घटनास्थळी पोहचले मात्र विहिर ७५ फूट खोल आणि त्यात सुमारे ४० फूट पाणी होते. मातेसह दोघे मुले तळाशी गेले होते. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तीन मोटारी मागवून विहिरीतुन पाणी काढणे सुरू केले. तब्बल अडीच तासांनंतर पाणी कमी झाल्यावर दहिवद येथील संदीप पाटील व तुषार पाटील यांनी विहिरीतून प्रेत बाहेर काढले. तिघांचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सचिन पाटील यांच्याकडे ७ बिघे शेती आहे. त्यांचे वडील निवृत्त वायरमन आहे. भारतीने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही