शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बारा दिवसात पोलिसांनी जप्त केल्या पाच पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 12:57 IST

महानिरीक्षकांची विशेष मोहीम, दारु प्रकरणात १६३ जणांना अटक

जळगाव : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांच्या आदेशाने २७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गुन्हेगारांकडे ५ पिस्तुल, १ जीवंत काडतूस, तलवार इतर २ शस्त्र आढळून आली तर अवैध दारु संदर्भात २२७ गुन्हे दाखल करण्यात आले असून १६३ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली आहे.गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांनी जिल्ह्यात १२ दिवस विशेष मोहीम राबवून आॅपरेशन आॅल आऊट राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी जळगाव व चाळीसगाव या दोन्ही परिमंडळात एकाचवेळी मोहीम राबविली. त्यात गुन्हेगारांच्या घराची झडती, फरार आरोपींचा शोध, ज्या गुन्हेगारांवर शस्त्रसंबंधी गुन्हे दाखल आहेत, त्यांची घरझडती, अंमली पदार्थ, पकड वारंट याबाबत धडक मोहीम राबवून कारवाई करण्यात आली.अवैध दारुच्या गुन्ह्यात ९ लाख ३५ हजार तर जुगाराच्या कारवाईत १० लाख ५९ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल व रोकड हस्तगत करण्यात आली आहे.या मोहिमेत जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गुन्हेगाराकडे १ गावठी पिस्तुल तर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक पिस्तुल, दोन चॉपर व तलवार आदी जप्त करण्यात आले. याच काळात ३१४ जणांना जामीनपात्र वारंटची तर ५७४ अजामीनपात्र वारंटची बजावणी करण्यात आली. अनैतिक देह व्यापाराचाही पर्दाफाश करण्यात आला. त्यात सहा पीडितांची सुटका करण्यात आली.महानिरीक्षकांच्या आदेशाने १२ दिवस जिल्ह्यात मोहीम राबविण्यात आली. जिल्हास्तरावरही यापूर्वी मोहीम राबविण्यात आली आहे. न्यायालय व पोलीस यंत्रणेचा धाक गुन्हेगारांवर असावा यासाठी अशा प्रकारची मोहीम राबवून गुन्हेगारांना अटक केली जाते.भविष्यात हद्दपारीची मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Jalgaonजळगाव