शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विझल्या 'चुली' जरी मुखी मिळाला 'घास' !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 15:22 IST

नगरसेवक संजय रतनसिंग पाटील आणि माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्या दातृत्वातून ४५० मजूर कुटुंबांच्या चुली पुन्हा पेटल्या आहेत.

ठळक मुद्देचाळीसगावच्या प्रभाग क्रमांक आठमधील मजूर कुटुंंबेप्रत्येकी ५०० रुपयांचे किराणा सामान दिले मोफतनगरसेवकांची माणुसकी

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : भयावह आजार 'कोरोना...' त्याची भीती अशी की उंबऱ्यातून बाहेर पाय ठेवायचा नाही... सगळेच लॉकडाऊन... रोजगारही गेला... पोट हातावरच... त्यामुळं चुली विझल्या... चिल्यापिल्यांची उपासमार... अशातच शुक्रवारी पेटला माणुसकीचा अंगार अन् मिळाला मुखी घास. प्रभाग क्रमांक आठमधील हे दृष्य एखाद्या चित्रपटाला साजेसं. मात्र नगरसेवक संजय रतनसिंग पाटील आणि माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्या दातृत्वातून सत्यात उतरलं. त्यांच्या मदतीने ४५० मजूर कुटुंबांच्या चुली पुन्हा पेटल्या आहेत.'कोरोना' संसर्गजन्य आजाराने रोजंदारी करणा-या कुटुंंबांच्या हक्काचा रोजगार हिसकावून घेतला. घराबाहेर न पडण्याची 'लक्ष्मणरेषा' त्यांच्या पोटावरही उमटली. लॉकडाऊन असल्याने सगळ्या रोजगार आणि उद्योग, व्यवसायांना टाळे लागले आहे.प्रभाग क्रमांक आठमध्ये श्रमिक कुटुंंबांची संख्या सर्वाधिक असून मजूर रोजंदारी मिळवून उदरनिर्वाह करतात. गेल्या दहा दिवसात त्यांच्या हाताला काम न मिळाल्याने त्यांची उपासमार सुरू झाली आहे. ही बाब प्रभागाचे नगरसेवक व पालिकेचे भाजप गटनेते संजय रतनसिंग पाटील व माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्या लक्षात आल्यानंतर ते मजुर कुटुंबांच्या मदतीला धावले.बाळासाहेब मोरे यांच्या पत्नी याच प्रभागातील विद्यमान नगरसेविकाही आहे.प्रत्येकी ५०० रुपयांचा किराणाप्रभागातील सर्वच मजुर कुटुंबांचा शोध घेण्यात ४५० कुटुंबांची यादी तयार झाली. नगरसेवक पाटील व मोरे यांनी स्वखर्चाने प्रत्येक कुटुंबाला ५०० रुपयेप्रमाणे गहू, तांदूळ, साखर, बिस्कीट व तिखट अशा जीवनावश्यक वस्तूंचा किराणा सामान वितरीत केला. किराणा सामान मिळाल्याने मजुरांच्या वस्तीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChalisgaonचाळीसगाव