नरडाणा/पिंपळनेर : वादळी पावसाने रविवारी दुपारी नरडाणा, पिंपळनेर परिसराला झोडपून काढले. शिंदखेडा तालुक्यातील अजंदे येथे सुपारीएवढ्या गारांसह तर नरडाणा येथे काही ठिकाणी बारीक गारांसह जोरदार पाऊस झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या वादळाने या संपूर्ण परिसरातील विजेचे खांब, झाडे मोठ्या प्रमाणात कोसळली. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरू झालेला नव्हता. शिंदखेडा तालुक्यात तापी नदीच्या दक्षिण काठावरील नरडाण्यासह पिंप्राड, अजंदे, गव्हाणे, दत्ताणे व वर्शी या गावांना पावसाने फटका दिला. विजेचे खांब, झाडे उन्मळून पडले. त्यामुळे वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत ठप्प झाला. या गावांच्या सरपंचांशी बोलून नुकसानीची माहिती घेतली. गव्हाणे येथे दुपारी जोरदार वादळ व पाऊस झाल्याचे तेथील सरपंच मोतीलाल पाटील पाहा/७ अजंद्यात गारांसह वादळी पाऊस (पान १ वरून) यांनी सांगितले. दभाशी गावाचा अपवाद वगळता उर्वरीत गावांना पावसाने चांगलेच थैमान मांडले. अजंदे येथे सुपारीएवढी गार झाली. दीड ते दोन तास पाऊस झाला. त्यानंतर त्याचा जोर ओसरला. कापसाची नांगरटी केलेल्या शेतकर्यांना मशागतीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. पिंपळनेर परिसराला तडाखा पिंपळनेरसह परिसरातील बल्हाणे, देशशिरवाडे, चिकसे, सामोडे, जेबापूर, डोंगरे दिगर, शेलबारी या गावांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला. सव्वातीन वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. अर्धा ते पाऊणतास पावसाचा जोर होता. यामुळे शेतकर्यांची धावपळ उडाली. वीटभट्ट्यांचेही नुकसान सामोडे येथे वादळ व पावसाचा जोर अधिक होता. विजेचे दोन खांब, झाडे कोसळून पडली. तेथे चाळी तुटून पडल्याने कांदा ओला झाला. धमनारला झाडे जमीनदोस्त साक्री तालुक्यातील धमणार, चिकसे येथे दुपारी साडेतीन वाजता वादळी पाऊस झाला. प्रचंड वार्यांमुळे मोठमोठी झाडे जमीनदोस्त झाली. पावसाचा जोर तासभर टिकला. पावसाने शेतकर्यांसह लग्नाच्या वºहाडींची तारांबळ उडविली. वादळाने चिंच, निंब, आंबा या प्रकारची झाडे कोसळली. जेबापूर फाट्यावर असलेले संजय नेरकर यांचे पत्र्याचे शेड वार्याने लांब अंतरापर्यंत उडून गेले. सुदैवाने जीवितहानीचे वृत्त नाही. कांदा चाळींचे मात्र मोठे नुकसान झाला आहे. गांगेश्वर जवळ असलेल्या चंद्रशेखर सूर्यवंशी यांच्या कांदाचाळीची पत्रे उडाल्याची माहिती संजय हेमाडे यांनी दिली.
अजंद्यात गारांसह वादळी पाऊस
By admin | Updated: May 19, 2014 01:49 IST