शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

टेंडरींगच्या ‘गोलमाल’चा ‘एण्ड’ होईल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 12:43 IST

हितेंद्र काळुंखेटेंडर प्रक्रिये मधील घोटाळे लक्षात घेता शासनाने ‘ई- डेंटरींग’ प्रक्रिया निर्माण केली. मात्र कायदे जेवढे येतात, तेवढ्याच त्याच्या पळवाटा शोधल्या जातात. याचप्रमाणे चालाख ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मिळून या प्रक्रियेतही ‘हुषारी’ साधली आहे. असे प्रकार वाढतच असून जिल्हा परिषदेच्या टेंडर प्रक्रियेतील ‘गोलमाल’ एका मागे एक ओपन होत आहे. टेंडर आपल्यालाच ...

हितेंद्र काळुंखेटेंडर प्रक्रिये मधील घोटाळे लक्षात घेता शासनाने ‘ई- डेंटरींग’ प्रक्रिया निर्माण केली. मात्र कायदे जेवढे येतात, तेवढ्याच त्याच्या पळवाटा शोधल्या जातात. याचप्रमाणे चालाख ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मिळून या प्रक्रियेतही ‘हुषारी’ साधली आहे. असे प्रकार वाढतच असून जिल्हा परिषदेच्या टेंडर प्रक्रियेतील ‘गोलमाल’ एका मागे एक ओपन होत आहे. टेंडर आपल्यालाच मिळावे म्हणून सराईत ठेकेदार हे अधिकाºयांना हाताशी धरुन वेगवेगळ्या क्लुप्त्या करुन नियमाच्या चौकटीत राहून गोलमाल करताना दिसतात.या प्रकारांविरुद्ध मात्र आता ओरड वाढली आहे. यामुळे टेंडर मधील ‘गोलमाल’ वन, टू, थ्री... अशी सिक्वेनच जणू ‘रिलीज’ होवू लागली आहे.अनेकदा एकच व्यक्ती वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या रेटचे टेंडर भरतो. यात इतर टेंडरच्या तुलनेत जे टेंडर कमी दराचे असेल ते टेंडर मंजूर होतेच. यामुळे काम हातून सुटत नाही. यासंदर्भात अन्य एका ठेकेदारानेच स्वत: ला काम न मिळाल्याने तक्रार करुन हा ‘फंडा’ उघड केला. टेंडर प्रक्रियेतील वाढते घोळ लक्षात घेता शिवसेनेने स्थायीच्या सभेत प्रश्न गाजवून इस्टीमेटच्या ५ टक्के पेक्षा कमी दराचे टेंडर मंजूर झाल्यास अशा कामांची स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी यांंनी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. कारण कमी दरात काम केल्यास ते निकृष्ट होणार हे नक्की त्यामुळे या प्रकारास आळा बसविण्याचा प्रयत्न शिवसेने केला असला तरी त्यांची ही मागणी किती गांभिर्याने घेतली जाते ते शेवटी महत्वाचे आहे.टेंडर प्रक्रियेतील ही बोंबाबोम एवढ्यावरच थांबली नाही तर थेट आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पर्यंत यासंदर्भातील तक्रार पोहचली. पॉलीमर बेंचेसच्या निवेदाबाबतच्या या तक्रारीची दखल घेत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांना या निवेदेची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. या निविदेत अशा काही अटी आहेत, की विशिष्ट ठेकेदारच हे टेंडर भरु शकतील. जि. प. कडे त्या अटींच्या तपासणीबाबतची यंत्रणा देखील नसताना जाणीवपूर्वक अशा अटी टाकल्याची तक्रार पुढे आली.दरम्यान ही निविदा वादात सापडल्याने व तक्रारी येत असल्याने ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची शिफारस शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केली आहे. अटी शर्ती डावलून काढण्यात आलेल्या या निविदेत आतापर्यंत तीन कंत्राटदारांनी बेंचेसचे नमुने शिक्षण विभागाकडे सादर केले असून निविदा प्रक्रिया रद्द करावी लागत असणे ही नामुष्कीच असून तक्रार आली नसती तर ही निविदा सरळ सरळ मंजूरच झाली असती. अशा प्रकारे ओरड झाल्यावर केवळ एखादी निविदा रद्द करण्याचे पाऊल उचलून भागणार नाही तर निविदांमधील हा ‘गोलमाल’ एण्ड कसा होईल, याचा विचार होणे गरजेचे आहे.