शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

रस्ते, उड्डाणपुलांचा प्रश्न सोडविणार

By admin | Updated: January 6, 2017 01:18 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन : आचारसंहितेनंतर विकास कामांना येणार गती;

जळगाव : रखडेली राष्ट्रीय महामार्गाची कामे, समांतर रस्ते, महापालिकेचा हुडकोकडील कर्जाचा विषय, व्यापारी संकुलांचा कराराचा प्रलंबित प्रश्न तसेच शहरातील उड्डाणपूल आदी प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी महापौरांना दिले. त्यासाठी जळगावात संपर्क कार्यालय व पाठपुराव्यासाठी एका तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच जिल्हा दौ:यावर आले होते. आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा नियोजन मंडळाची बैठक रद्द झाली, मात्र त्यांनी महाबळ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी निवेदने, तक्रारी स्वीकारल्या. त्यासाठी एकच गर्दी झाली होती.महापालिकेला मदत करणार-पालकमंत्रीमहापौर नितीन लढ्ढा यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन विविध प्रलंबित विषयांवर चर्चा केली. यात महामार्गाच्या समांतर रस्त्यांचा प्रश्न, महामार्गाचे चौपदरीकरण, वळण रस्ता (बायपास),  शहरातील प्रस्तावित उड्डाणपूल, महापालिकेचा हुडकोकडील कर्जाचा विषय, व्यापारी संकुलांचा प्रलंबित विषय या विषयी प्रश्न मांडले.   याबाबत सहकार्याचे आश्वासन   देऊन   दिल्ली, मुंबईत येऊन पाठपुरावा करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती नेमली जावी. सततत्या पाठपुराव्यातून हा प्रश्न सुटेल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी महापौरांना दिले.  माजी स्थायी समिती सभापती नितीन बरडे यावेळी उपस्थित होते. स्थानिक अनेक प्रश्न आजच्या बैठकीतून  सुटू शकले असते मात्र आचारसंहिता असल्यामुळे मर्यादा असल्याचे ते म्हणाले. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी आली. मात्र त्यांनी जिल्हावासीयांना वेळ  न दिल्याने तब्बल आठ महिन्यानंतर जिल्ह्याच्या संपर्कात राहीलेल्या चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्रीपद मिळाल्याने कार्यकत्र्यामध्ये आज उत्साह दिसून आला. चंद्रकांत पाटील यांचा  अभाविप, जिल्ह्यातील नेते मंडळींच्या कुटुंबियांशी संपर्क व परिचय होता. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी सकाळपासून गर्दी झाली होती.  यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याअंतर्गत असलेली जनकल्याण समिती, ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते विजय मोहरीर, चत्रभुज सोनवणे, शिवाजी भोईटे,  अॅड. किशोर काळकर, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन इंगळे,  चंद्रकांत बेंडाळे, अरूण बोरोले, प्रवीण कुलकर्णी, भुपेश कुलकर्णी, शिवदास साळुंखे, प्रदीप रोटे, घनश्याम अग्रवाल यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिका:यांनी हजेरी लावली. ट्रान्सपोर्ट असोसिएशनची  मुंबईत बैठकट्रान्सपोर्ट असोसिएशनची एमआयडीसीतील जागा मनपाने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन हजार कुटुंबांची उपासमार होणार असून मनपाने यापूर्वी केलेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल असोसिएशनच्या पदाधिका:यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. अध्यक्ष जसपालसिंग बग्गा, अरूण दलाल, अशोक वाघ व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. इतक्या वर्षात हा प्रश्न प्रलंबित का ठेवला, असा प्रश्न पालकमंत्र्यांनी असो.च्या पदाधिका:यांना करून याप्रश्नी न्यायालयाकडून स्थगिती मिळवावी व मुंबईत आपणास येऊन भेटावे बैठक घेऊन मार्ग काढू असे आश्वासन पदाधिका:यांना देण्यात आले. चिमुरडय़ा चिन्मयीच्या साक्षीने मागितली पालकमंत्र्यांकडे मदतसिव्हील हॉस्पिटलमध्ये वाळलेल्या झाडाच्या फांदीने संगीता प्रवीण सोनवणे या महिलेचा बळी घेतला होता. या महिलेस चिन्मयी नावाची एक सात वर्षाची मुलगी आहे. कुटुंबाची अतिशय हलाखीची परिस्थिती असल्याने  मयत महिलेचे पती काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. मात्र या कुटुंबावर अचानक संकट कोसळले. चिमुरडी चिन्मयीचे मातृछत्र हरपले. या कुटुंबाला मदत मिळावी म्हणून जनकल्याण समितीचे पदाधिकारी पालकमंत्र्यांना भेटले. दीपक घाणेकर, जिल्हा कार्यवाह व्ही.जे. कोळी, योगेश्वर गर्गे यांच्यासह अन्य पदाधिका:यांनी यावेळी एक निवेदन पालकमंत्र्यांना दिले. या चिमुरडीच्या पुढील वाटचालीसाठी कुटुंबाला मदत मिळावी अपेक्षा यावेळी पदाधिका:यांनी करून शासनाकडून सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी घटनेची माहिती घेऊन एक लाखाची मदत या मुलीला दिली जाईल व आणखी काही मदत देण्याचा प्रय} करू असे सांगितले. सोनवणे कुटुंबियांपैकी मयत महिलेचा भाऊ उमेश कोळी, नंदोई शैलेंद्र कोळी, ननंद सरला कोळी, भाऊ उमेश कोळी यावेळी उपस्थित होते. यावेळी स्वत: चिन्मयी उपस्थित होती. पालकमंत्र्यांनी  तिच्या नातेवाईकांनी केलेल्या मागणीची तत्काळ दखल घेतली.‘क्रेडाई’च्या पदाधिका:यांशी चर्चाक्रेडाईचे अध्यक्ष अनिष शहा व इतरांनी यावेळी तलाठी कार्यालयात संगणक प्रणालीमुळे नोंदी घेताना येणा:या अडचणींबाबत निवेदन दिले. यातून मार्ग काढला जाईल असे आश्वासन देण्यात आले. धनंजय जकातदार,  सागर ताडे, प्रवीण खडके, नितीन पाटील, किशोर बोरोले उपस्थित होते.