शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

युतीतील मनभेद मिटणार की राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:00 IST

तालुका वार्तापत्र मुक्ताईनगर

ठळक मुद्देशिवसेनेच्या इशाऱ्यावर भाजपाचा प्रतिइशारा शिवसेनेच्या इशाऱ्यावर भाजपाचा प्रतिइशारा

मुक्ताईनगर : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यात युतीतील घटक पक्ष शिवसेना प्रमुख विरोधी भूमिकेत आहे. राज्यात भाजप- सेना युती झाली आहे. संभाव्य उमेदवार म्हणून खासदार रक्षा खडसे आहेत. अशात खडसे परिवारात लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास शिवसेना भाजपचे काम करणार नाही अशी भूमिका स्थानिक शिवसेना नेत्यांनी घेतली आहे. युती धर्म न पाळल्यास त्याचे अन्य ठिकाणी पडसाद उमटतील असा इशारा आमदार खडसे यांनी दिला आहे. यामुळे युतीतील मनभेद या निवडणुकीत कायम राहतील की, शिवसैनिक भाजपचे काम करतील का ? हा औत्सुक्याचा विषय बनला आहे.भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रे्रेस असा राजकीय सामने रंगणाºया या तालुक्यात राष्ट्रवादी काँगेसला जि.प.सदस्य निवडीचे संमिश्र यश आणि पंचायत समितीे फक्त एक वेळेस ताब्यात मिळविण्यापलिकडे फारसे यश मिळाले नाही.सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप- सेना युती तुटली आणि शिवसेनेतर्फे चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविली. येथून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हे समिकरण बदलले आणि भाजप विरुद्ध शिवसेना असे चित्र तयार झाले. तालुक्यात शिवसेनेचे संघटन आणि प्रभाव वाढला आहे, परंतु निवडणूक यशात ते उतरवू शकलेले नाही.मध्ये जि.प., पं.स.निवडणुका झाल्या. मुक्ताईनगर तालुक्यातील ४ पैकी ४ जि. प. व ८ पैकी ६ पं.स. जागा भाजपा ने मिळविल्या आणि नुकतेच मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षासह १७ पैकी १४ जागा भाजपाने मिळविल्या. त्यामुळे भाजपची तालुक्यातील पकड कायम आहे. अश्यात राज्यात भाजप सेना युती असल्याने भाजप विरोधात संघर्ष करून अस्तित्व निर्माण करणारे शिवसैनिक भाजपाचा प्रचार करतील की विरोधात जातील हे लक्ष वेधी ठरणार आहे.खासदार रक्षा खडसे यांची कामगिरीच्या आधारावर उमेदवारी निश्चित मानले जात आहे. एकनाथराव खडसे यांच्या वलयापलिकडेही त्यांनी फळी उभारलेली आहे.एकनाथराव खडसे राज्यात सत्ता असतांना तब्बल पावणेतीन वर्षांपासून सत्तेपासून लांब आहेत.‘हमे तो अपनों ने लूटा गैरो मे कहा दम था’ अशा अवस्थेत असलेले खडसे यांनी संघर्षातून खान्देशात पक्ष वाढविला हे जगजाहीर आहे. आणि आज सत्तेची फळ त्यांच्या हाताखाली काम करणारे चाखत आहेत, अशीखंत व्यक्त केली जात आहे. पक्षात त्यांना अडवाणींसारखे मार्गदर्शक मंडळात टाकण्याचे सुरू असलेले प्रयत्न क्लेश दायक आहेत. काहीही झाले तरी पक्ष सोडणार नाही, ही भूमिका खडसे यांनी घेतली आहे त्यामुळे पक्षाविरोधात बोलता येईना आणि मनाची खंत रोखता येईना. यातून त्यांनी अनेक खळबळजनक विधाने करून संकट वाढविले असल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :Politicsराजकारण