शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

यंदा उपाययोजना करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:16 IST

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षकाच्या अधिकारातंर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ...

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षकाच्या अधिकारातंर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येत असते. या जागांसाठी दरवर्षी सात ते आठ हजार अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त असतात. मात्र, तरी सुध्दा हजारावर आरटीईच्या जागा रिक्त राहतात. गेल्या तीन ते चार वर्षांपासून जागा रिक्त राहण्याची परंपरा कायम आहे. मात्र, त्यावर कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही. यावर्षी जागा रिक्त राहू नये यासाठी काय उपाययोजना राबविल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नुकतेच ३ मार्च पासून आरटीई प्रवेशासाठी पालकांकडून ऑनलईन अर्ज मागविले जात आहे. पहिल्याच दिवशी पाचशेवर पालकांनी अर्ज केले. ३१ मार्चपर्यंत पालकांना अर्ज करता येणार आहे. मात्र, यंदाही राखीव जागा रिक्त राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. पाल्याची प्रवेश निश्चितीसाठी पालकांना संदेश पाठविला जातो. मात्र, ग्रामीण भागातील पालकांना कधी संदेश प्राप्त होत नाही. त्यामुळे ते शाळापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे पाल्यास प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येते. मागील वर्षी अकराशे जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे यंदाही जागा रिक्त राहणार नाही. याची काळजी घेणे आवश्यक आहे. आरटीई प्रवेशासाठीचा अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन व ॲपची सुविधा शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली होती.मात्र, ॲपला पालकांचा कमी प्रतिसाद मिळताना दिसून येत. यंदा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे. यावर्षी ३ हजार ६५ जागांसाठी आजापर्यंत १ हजार ८०० पालकांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाकडून कागदपत्रांबाबत आवश्यक सूचना करण्यात आल्या आहे. अद्याप लाॅटरी संदर्भात कुठलीही तारीख जाहीर झालेली नाही. यावेळी किती मुलांचे सिलेक्शन होते. याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.