शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताई सूतगिरणीतील चात्यांची क्षमता वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 01:38 IST

मुक्ताई सूतगिरणीची वार्षिक सभा : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची माहिती

ठळक मुद्देआमदार एकनाथराव खडसे यांनी, गिरणीने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच शासनाकडून गिरणीस अद्याप अंदाजे ३.५० कोटी रुपये भाग भांडवल स्वरूपात मिळणे बाकी आहे हे मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे, यातून चात्याची क्षमता १२,५०४ पर्यभविष्यात प्रकल्प क्षमता २५ हजार चात्यावर नेऊन प्रकल्पात जिनिंगची उभारणी करून भागधारक कापूस उत्पादकांचा कापूस खरेदी करून कापूस गठान गठाणपासून धागा निर्मिती ते कापड निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील आह. यातून आपल्या परिसरात आणखी रोजगार उपलब्ध होईल.

मुक्ताईनगर, जि.जळगाव : आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीची २३ वार्षिक सर्वसाधारण सभा सूतगिरणी साइटवर चांगदेव शिवारात शनिवारी पार पडली. सद्य:स्थितीत असलेल्या चात्याची क्षमता वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.या वेळी प्रस्ताविक करताना सूतगिरणीचे संचालक रमेश ढोले यांनी सांगितले की, कापूस उत्पादक असलेल्या आपल्या भागात सूतगिरणी असावी या हेतूने माजी मंत्री, आमदार एकनाथराव खडसे यांनी २३ वर्षांपूर्वी आपल्या सर्वांच्या सहकार्याने सूतगिरणीची स्थापना केली. गिरणीचे स्व.अध्यक्ष निखिल खडसे यांनी गिरणी उभारणीमध्ये मेहनत घेतली. दुर्दैवाने त्यांचे निधन झाल्यानंतर सध्याच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी अथक मेहनत घेऊन प्रकल्प उभारणी पूर्णत्वास नेली. आज प्रकल्प ९५०४ चात्याच्या क्षमतेचा चालत आहे. याद्वारे ४०० जणांना रोजगार उपलब्ध झाला असून, यातील २०० कामगार महिला असल्याचे सांगितले.उपाध्यक्ष संजय रघुनाथ चौधरी, संचालक दशरथ कांडेलकर, रमेश ढोले, राजू माळी, तुकडू घटे, लक्ष्मण भालेराव, भागवत पाटील, राजकुमार खंडेलवाल, देवराम सुपे तसेच बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जि.प.सदस्य कैलास सरोदे, वैशालीबाई तायडे, वनिताबाई गवळे, भानुदास गुरचळ पं.स.सदस्य विकास पाटील, नगरसेवक पीयूष महाजन, विलास धायडे, शिवाजीराव पाटील, भागवत टिकारे, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे व सूतगिरणीचे भागधारक शेतकरी उपस्थित होते.सरव्यवस्थापक जयंत उंबरकर यांनी लेखाजोखा मांडला. कार्यालय अधीक्षक डी.एम.जगताप यांनी आभार मानले.