शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

बायको सुटली, जीवनयात्रा संपली. मात्र दारु सोबतीलाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 13:08 IST

अनेक कुटुंबाचे दु:ख : दारूच्या तिरडीसाठी वढोद्यासह खिर्डीत महिलांचा लढा

ठळक मुद्देस्त्रीशक्तीच्या जळगाव वा:याही सुरूचपिणा:याला दाखवतात इंगादारुने संपवले अनेक तरुण

ऑनलाईन लोकमत / हितेंद्र काळुंखे

जळगाव, दि. 17  -  विक्रांत 26 वर्षांचा होता. त्याची बायको सुटली, पण दारू नाही सुटली. अखेरचा श्वासही त्याने दारूच्या घोटासह घेतला. विक्रांतचा चूलत भाऊ संतोषही दारूचा बळी ठरला. दारूमुळे आकांत वाटय़ाला आलाय, अशी  विक्रांतची आई काही खिर्डी गावात (ता. रावेर) एकटीच नाही. काहींनी मुले गमावली तर काहींनी पती. उशिरा का होईना दारूने पोळलेले नारी शक्तीचे शेकडो हात आता दारुविरुद्ध एकवटले आहेत.देशी, इंग्लिश, हातभट्टी अशी सर्व दारु बंद व्हावी म्हणून स्त्रीशक्तीच्या संघर्षाला खिर्डी (ता. रावेर) येथे पाच वर्षे उलटलेली आहेत.  यासाठी स्त्रीशक्तीच्या जळगाव वा:याही सुरूच आहेत. काहींची तर मजुरीही बुडते.  पदरचे एसटी बसचे भाडे खर्च करून या महिला अधूनमधून जळगावला येतात.  दोन दिवसांपूर्वीच विक्रांतच्या मातोश्री अलकाबाई शंकर तावडे आणि अनेक महिला पोलिस अधीक्षक कार्यालयात साहेब केव्हा येतायेत म्हणून वाट बघत बसलेल्या होत्या. ‘आमच्या घरात गमवायला आता काही शिल्लक उरलेलं नाही, पण जे आम्ही भोगलं ते आता गावात कुणाच्याही वाट्याला येऊ नये, असं मला वाटतं म्हणून माझा हा आटापिटा..’ असे या महिलांपैकी एक उषा पाटील यांनी सांगितले.दारुमुळे विनोद दत्तू कोळी (35), प्रमोद दत्तू कोळी (38) हे दोन्ही भाऊ वर्षभरात एकापाठोपाठ गेले. मुरलीधर रुपचंद कोळी, विजय माधव कोचुरे अशी दारूने संपवलेल्या अनेक  तरुणांची नावे ऐकायला मिळाली. खिर्डीतून अनेक तिरडी निघायला ही ‘दारू’ जबाबदार आहे. शाळेतली मुलं सुद्धा गुत्त्यावरून आम्ही पकडलेली आहेत आणि कुटत कुटत घरी आणली आहेत, असेही या महिलांनी सांगितले.स्वाती भिरूड, शालिनी कोळी, सरपंच पौर्णिमा  ठोंबरे, माधुरी पाटील, मीनाक्षी पाटील यांनी दारूविरुद्ध आपली मुठ आवळलेली असून गावात एखादीला तिचा नवरा दारू पिऊन त्रास देत असेल तर या सगळ्या एकत्र तिथं धडकतात आणि आपला इंगा दाखवून देतात. पण या लढय़ाला  कायद्याची साथ असणं आवश्यक आहे, अशी या महिलांची अपेक्षा आहे. वढोदा (ता. चोपडा) येथून आलेल्या कमलबाई विजय भिल, अक्काबाई अहिेरे, मीनाबाई वानखेडे अशा अनेक मद्यपिडित भगिनीही पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेल्या होत्या. अक्काबाईंनी पती गमावलाय. गावातील दारूचे बळी ठरलेले संदीप शिवाजी पाटील, विजय तंगा पाटील यांच्या घरातील महिलाही  दारुविरुद्धच्या या लढाईत उतरल्या आहेत. दोन्ही गावातील या महिलांची संध्याकाळी साहेबांशी भेट झाली. नियमानुसार नक्की काही तरी करु असे आश्वासन मिळाले.  आणि मोठय़ा आशेसह या महिला गावाकडे परतल्या. मात्र दारुचा गावाला मिळालेला शाप मिटलाच पाहिजे, यासाठीचा लढा दारुचा पराभव होई र्पयत सुरुच राहील, असा निर्धारही जाता जात त्यांनी व्यक्त केला.