शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाला पारदर्शकतेचे वावडे का ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 17:40 IST

जळगाव शहरातील जनहिताच्या प्रकल्पांची जी वाट लागली आहे, ती परिस्थिती राज्यातील बहुतांश शहरांमध्ये आहे. वेगळे काही नाही. उदाहरण म्हणून जळगावातील रेंगाळलेल्या, रखडलेल्या प्रकल्प, योजनांचा आढावा घेतला तरी संतापजनक, निराशाजनक चित्र समोर येते. 

ठळक मुद्दे जनतेच्या प्रतिनिधींची भूमिकादेखील संशयाच्या भोव-यात पाणी, आरोग्य, दळणवळणाशी संबंधित प्रकल्प का रखडतायत?कराच्या पैशांची खुलेआम उधळपट्टी होत असताना सारेच गप्प कसे ?

 मिलिंद  कुलकर्णी जळगाव : शहरातील जनहिताच्या प्रकल्पांची जी वाट लागली आहे, ती परिस्थिती राज्यातील बहुतांश शहरांमध्ये आहे. वेगळे काही नाही. उदाहरण म्हणून जळगावातील रेंगाळलेल्या, रखडलेल्या प्रकल्प, योजनांचा आढावा घेतला तरी संतापजनक, निराशाजनक चित्र समोर येते. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहराची बिकट अवस्था असताना लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे, सगळे पक्ष आंदोलन कार्यात अग्रभागी असतात. परंतु, त्या पक्षांचे मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्याकडे कामासाठी पाठपुरावा करण्यास, किंवा पक्षाच्या ताब्यातील सत्तेचा उपयोग प्रशासन, कंत्राटदार यांच्यावर अंकुश ठेवण्यात, कामाला योग्य दिशा आणि गती देण्यात पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शक्ती का खर्च करीत नाही, हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. जळगावातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे कोरोनाशी लढण्यासाठी जगभर युध्दपातळीवर उपाययोजना सुरु आहेत, मात्र जळगावात गल्लोगल्ली आणि रस्ते, उपरस्ते कचºयांने तुडुंब आहेत. धुळ आणि धूराचा प्रचंड उपद्रव आहे. अनेक पालिकांनी काळ्या यादीत टाकलेल्या नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला स्वच्छतेचा ठेका देण्यास सत्ताधारी भाजपच्या सदस्यांचा विरोध होता. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशापुढे त्यांना नमावे लागले आणि ठेका देण्यात आला. महापालिकेने स्वमालकीच्या घंटागाड्या कंत्राटदाराला वापरायला दिल्याबद्दलदेखील काही अभ्यासू नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ७ महिन्यात स्वच्छतेचा बो-या वाजला. कंत्राटदाराने नेमलेल्या घंटागाडी चालक, सफाई कामगार यांनी वेतनासाठी अनेकदा आंदोलने केली. स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी महासभेत झाल्या. त्यात सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही नगरसेवक आघाडीवर होते. ५० लाख रुपयांचा दंड कंत्राटदाराला करण्यात आला. पण प्रशासनाने तो माफ केला. आता प्रशासनाने तो का माफ केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कंत्राटदाराकडील घंटागाड्या आणि वाहने महापालिकेने काढून घेतली. आता कंत्राट सुरु आहे की, बंद आहे हे कळायला मार्ग नाही. हीच स्थिती एलईडी पथदिवे लावण्याच्या कामातही आहे. विजेच्या बचतीसाठी गाजावाजा करीत हे कंत्राट देण्यात आले. प्रत्यक्षात ५० टक्के दिवे बंद असल्याचे आढळून आले. त्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. महामार्ग चौपदरीकरण करताना प्रभात चौकातील अंडरपासचा मुद्दा अलिकडे असाच पुढे आला. आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित केला असताना त्याचे निराकरण अद्याप होत नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला पारदर्शकतेचे एवढे वावडे का, हे तरी एकदा कळू द्या. 

जळगावातील शिवाजीनगर उड्डाणपुलाविषयी जनतेचे काही आक्षेप होते. त्यांनी रेल्वे, महापालिका यांच्याकडे ते मांडले. मात्र जनसुनावणी न घेताच काम रेटण्यात आले. आता तो प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने मुदतवाढ दिली गेली. खर्च वाढला आणि गैरसोयीचा कालावधी वाढला, याला जबाबदार कोण? कोणामुळे प्रकल्पाला विलंब झाला, याची जबाबदारी तरी निश्चित व्हायला हवी की, नको. ही पारदर्शकता ठेवायला प्रशासन का तयार होत नाही? लोकप्रतिनिधी जोर का देत नाही? 

सत्ता कुणाचीही असो कंत्राटदार तेच असतात, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. त्यामुळे जनहिताच्या योजनांची वाट लागणे हे क्रमप्राप्त असते. सत्ताधारी आणि विरोधकांची छुपी युती असेल तर मुदतवाढ, दंड माफ असे प्रकार राजरोस घडतात. जनता निमूटपणे हे सारे बघते. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव