शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकारांवर अंकुश ठेवणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:04 IST

जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळणे महत्वाचे

हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी नुकतीच भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील आरोग्य उप केंद्रास अचानक भेट दिली असताना हे केंद्र बंद असलेले आढळले. ही पाहणी ग्रामस्थांच्या तक्रारीवरुन करण्यात आली होती. हे केंद्र महिन्यातून एकदाच उघडते अशी तक्रार ग्रामस्थांची आहे. या तक्रारीची दखल जि. प. अध्यक्षांनी घेतली ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. एवढेच नाही तर इतर अनेक ठिकाणीही अचानक भेटी देवून पाहणी करण्याचे त्यांनी ठरवले आहे.दरम्यान ही जबाबदारी संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे, त्यांचाच मात्र वचक व नियंत्रण नसल्याने असा प्रकार समोर आला आहे, अशीच प्रतिक्रिया या निमित्ताने उमटत आहे. दरम्यान ही बाब केवळ एका ठिकाणची समोर आली आहे. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही परिस्थिती असू शकते. ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय प्रश्नावर सर्वात मोठा आधार हा आरोग्य केंद्राचाच असतो. मात्र अनेक आरोग्य केंद्रांमध्ये कधी डॉक्टर हजर नसतात तर कधी हवी ती औषधी नसतात. कर्मचारी कमी असणे किंवा दांडीबहाद्दर आदी काहीही करणे असले तरी यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत असते. यास काही अपवादही आहेत. काही आरोग्य केंद्रांचे काम चांगलेही आहे. अशा आरोग्य केंद्रांचा आदर्श इतरांनी घेणे गरजेचे आहे, परंतु जे आपले कर्तव्य विसरत असलील अशांवर अंकुश कोण ठेवणार ? हा प्रश्न आहे.माणूस म्हटला की, काही चांगले आणि काही वाईट अशा दोन्ही प्रवृत्तीचे लोक आढळतात. यासाठीच चुकीच्या बाबींवर अशांवर नजर ठेवणे आवश्यक असते. मात्र ज्यांच्यावर ही जबाबदारी असते ते देखील आपली जबाबदारी पार पडत नसले तर इतरांना ते फावते. ही बाब लक्षात घेता चुकीच्या गोष्टींना आळा घालत जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळणे हेच महत्वाचे आहे.