शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सोयरसुतक कुणाला...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 17:07 IST

विश्लेषण

 सुशील देवकर

बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा विक्रीतून उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, कांद्याला अनुदान वाढवून द्यावे, या मागण्यांसाठी एरंडोल तालुक्यातील खर्ची परिसरातील कांदा उत्पादक शेतकºयांनी शुक्रवार, २५ रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मोफत कांदे वाटप’ हे अभिनव आंदोलन केले. तब्बल ३ ट्रॅक्टर कांदा मोफत वाटप करण्यात आला. भाव मिळत नसल्याने उत्पादनखर्चही निघत नसल्याने वैतागलेला शेतकरी कांदा फुकट वाटून आंदोलन करीत असताना तो कांदा फुकटात मिळतोय, म्हणून घेण्यासाठी नागरिकांनी मात्र गर्दी केली होती. अगदी लोटालोटी करीत जास्तीत जास्त कांदा मिळेल, त्या पिशवीत, भांड्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू होता. हे चित्र पाहिल्यावर शहरातील नागरिकांना काबाडकष्ट करूनही नशिबी अवहेलना येणाºया शेतकºयाबद्दल, त्याच्या अडचणी, समस्या, वेदनांबद्दल काहीही सोयरसुतक नसल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. कांदा मिळताच विजयी मुद्रेने हे नागरिक आपल्या वाहनाकडे वळताना दिसत होते. नागरिकांच्या या मनोवृत्तीपेक्षा राजकारण्यांची मनोवृत्ती काही वेगळी आहे, असे नाही. त्यांनाही त्यांच्या राजकारणापेक्षा व मतांच्या गणितापेक्षा अधिक महत्वाचे काहीही नाही. त्यामुळेच शेतकºयांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. तर अधिकारी, प्रशासनाला शेतकºयांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला, त्यांच्या उपोषणस्थळी जाऊन चर्चा करायलाही वेळ नाही, अशीच परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ८ वेगवेगळे मंडप टाकून विविध समस्यांसाठी, मागण्यांसाठी नागरिकांनी, शेतकºयांनी उपोषण केल्याचे चित्र यंदा दिसून आले. मात्र तरीही प्रशासनाने अनास्था दाखविली. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारत सार्वभौम झाल्याच्या दिवसाचा आनंद सगळीकडे साजरा होत असताना काही लोक मात्र स्वत:च्या हक्कासाठी, अन्यायावर दाद मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत बसून होते.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे चळवळीतून पुढे आलेले असल्याने त्यांनी राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी केलेले आवाहन सकारात्मकपणे घेत आकाशवाणी चौकापासून पायीच उपोषणकर्त्यांपर्यंत जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. केवळ दिखाऊपणा नव्हे तर तब्बल अर्धा तास त्यासाठी दिला. हे त्यातल्या त्यात दिलासादायक म्हणावे लागेल.