शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हाक मारी जीव कुणाला...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:58 IST

धरणगाव येथे बालकवींच्या स्मारकाची आजची स्थिती

धरणगाव, जि.जळगाव :काय पाहिजे मिळवायला ?कुणीकडे हा झुकतो वाराहाक मारी जीव कुणाला ...?बालकवींच्या ‘उदासीनता’ या कवितेतील काव्यपंक्ती त्यांच्या जीवनातील उग्दिन्नता, दु:ख स्पष्ट करतात. त्यांच्या जीवनात आलेली उदासिनता त्यांच्या साकारल्या जाणाऱ्या स्मारकाबद्दल ही त्यांना व साहित्यिकांना शासनाच्या धोरणामुळे आलेली दिसते.बालकवींनी ज्या भूमीत जन्म घेतला त्या भूमित साकारले जाणारे स्मारक गेल्या पाच-सहा वर्षापासून अर्धवट अवस्थेत निधी अभावी रखडले आहे. माजी पालकमंत्र्यांनी मुहूर्तमेंढ रोवलेल्या या स्मारकाचे काम सहकार राज्यमंत्र्यांनी तडीस न्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.१३ आॅगस्ट १८९० मध्ये धरणगावला जन्मलेल्या बालकवींची काव्या प्रतिभा याच भूमित फुलली.त्यांच्या पारवा, औदुंबर, श्रावणमासी, आदी कवितामधील शब्दरूपाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य साहित्यिक व साहित्यप्रेमींना आजही लाभते औदुंबर कवितेतील औदुंबर आज कोलमोडलेला असला तरी काळा डोह ब्राम्हण तलाव, निसर्ग सौंदर्य आजही श्रावण मासात अनुभवायला मिळते.स्मारकाचे अर्धवट काम...साहित्य कला मंच या संस्थेच्या पाठपुराव्यामुळे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सन २०१०-११ मध्ये बालकवींच्या स्मारकाची मुहूर्तमेढ रोवली. दोन एकर गावठाण जागेत बालकवींचे स्मारक उभारण्याचे काम त्यांनी हाती घेतले.स्मारकाच्या सरक्षक भिंतीसाठी ५५ लाख निधी जिल्हा नियोजन मंडळातर्फे मंजूर संरक्षक भिंत व भव्य प्रवेशद्वार उभारले. दुर्देवाने पुढचे काम निधीअभावी रखडले आहे.५ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव प्रलंबितस्मारकाचा संरक्षक भिंत व प्रवेशद्वाराच्या नंतर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने स्मारकाचा आराखडा तयार करून सन २०१२-१३ मध्ये पुढील कामासाठी ५ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविला आहे. मात्र या प्रस्तावाची दखल अद्याप घेतली गेलेली नाही. त्यामुळे बालकवींचे स्मारकाचे काम रखडले आहे.स्मारक होणार साहित्यिकांची पंढरीनिसर्ग कवी बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे स्मारक साकारले गेल्यास हे स्मारक साहित्यिकांची ‘पंढरी’ म्हणून नावारूपाला येईल. येथे विविध साहित्यिक उपक्रम राबविले जातील. स्मारक झाल्याशिवाय कवितांची कार्यशाळा, बालकवी साहित्य संशोधन केंद्र, आदी उपक्रम सुरू होणार नाही. तसेच कोलमडलेला ‘औंदुबर’ या स्मारकाच्या ठिकाणी नव्याने उभारण्याची संधी मिळणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्यDharangaonधरणगाव