शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

..बीती हुई कुछ (फिल्मी) यादें !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 12:36 IST

ज्याने हा (गीतांचा) सुरेखसा गजरा गुंफाला होता. मी निमित्तमात्र.’

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 19 - जळगाव येथील व. वा. वाचनालयाच्या 140व्या वर्धापन दिनानिमित्त व.वा. व कै. रामलालाजी चौबे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ कार्यक्रमाने खरंच मजा आली अन् मला ‘बिनाका गीतमाला’वाले अमीन सयानी आठवले. एका भेटीत ते मला म्हणाले होते, ‘‘बिनाका गीतमालेचं सारं श्रेय ‘त्या’ सुंदर गाण्यांना, त्या गीतकार- संगीतकार- गायकांना व त्या पांढ:या पडद्याला आहे. ज्याने हा (गीतांचा) सुरेखसा गजरा गुंफाला होता. मी निमित्तमात्र.’ बोलता- बोलता अमीन सयानी असंही म्हणाले होते की, ज्या विविध संगीतमय कार्यक्रमांनी त्या वेळच्या ‘किशोर अवस्थेतील मुलामुलींसह सर्वाची मनं जिंकली, ती गोष्टदेखील तेवढीच महत्त्वाची ठरते.’ नेमकी हीच गोष्ट निवेदक राहुल सोलापूरकर यांनीही सांगितली. ते म्हणाले, ‘1960 नंतर हिंदी चित्रपट सृष्टीतील चित्रपट गीतांचे एक सुवर्णयुग संपले. असे जरी म्हटलं जात असले तरी ‘त्या’ युगाची सुरुवात केव्हा झाली, संपली हे सांगणं तसं कठीण. पण 1945-48 ते 1970 र्पयत पांढ:या पडद्याने जी एकसे बढकर एक गाणी दिली, ती मात्र न विसरता येण्याजोगी!’ -‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’चा विषय सुरू आहे म्हणून एक किस्सा सांगतो. गायक रफी गेल्यानंतर 83-84 मध्ये मी मित्रासमवेत शम्मी कपूरला भेटलो होतो. तेव्हा ‘रफीमय’ शम्मी म्हणाला होता- ‘माङो सिनेमे व गाणी याचं अतूट नातं. आमचा चेहरा पाहत तुम्ही खूश होत होतात, स्वप्नं पाहत होतात, पण खरी स्वप्नं सजवली, फुलवली ती दिग्दर्शक, गायक-गायिका व संगीतकार, गीतकार यांनी. आहो, गीतकारांनी त्या वीसएक वर्षात जी गाणी लिहिली, ती गाणी नव्हती, एक मधूर काव्य होतं. ‘तुमसे अच्छा कौन है’ हे रफीचं गाणं ऐकवत शेवटी शम्मीएवढंच म्हणाला होता- ‘तुम्ही आम्ही नाही विसरू शकत हा काळ- मरेर्पयत!’ ज्या गायकाचा प्रभाव रफी, मुकेश, किशोरकुमारसह कित्येक गायकांवर होता त्या स्वरांच्या जादूगारापासून म्हणजेच कुंदनलाल, सैगलपासून ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ची सुरुवात होते व पुढे ती पृथ्वीराज कपूर, अशोककुमार, दिलीपकुमार, राजकपूर, देवआनंद, राजेंद्रकुमार, राजकुमार इत्यादीर्पयत येऊन पोहोचते. एकूणच कार्यक्रम टाळ्या मिळविणारा होता. ज्यासाठी व. वा. टीमचे, चौबे परिवाराचे अभिनंदन.‘जागे हैं देर तक हमें कुछ देर सोने दो, थोडी सी रात और है सुबह तो होने दो, आधे अधुरे ख्वाब जो पुरे ना हो सके, एकबार फिर से नींद में वो ख्वाब बोने दो’ गीतकार गुलझार यांच्या या सुंदरशा ओळींचा आधार घेत सांगायचं तर गेल्या पंधरवडय़ात जळगावात झालेल्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ (सूत्रधार- राहुल सोलापूरकर) कार्यक्रमाने सर्व कानसेनांना खरंच तृप्त केलं. नव्हे ‘त्या’ ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या जमान्यात नेत धुंद केलं, भिजवून टाकलं. घरी परतताना कित्येक हिंदी (जमाना 1948-1968) गीतांना आठवायला, आळवायला भाग पाडलं.-संकल्पना- दिग्दर्शन मिलिंद ओक, संहिता प्रवीण जोशी, सूत्रधार- राहुल सोलापूरकर व गायक- जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी, गायिका- स्वरदा गोखले, अवंतिका पांडे या ‘टीम’ने ज्या तयारीने ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ कार्यक्रम उत्तरोत्तर रंगवत नेला तो ‘वाह! वा! क्या बात है!’ असाच होता.- चंद्रकांत भंडारी