शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील १८ हजार विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:21 IST

- डमी - स्टार ८०५ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षी नववी झालेली मुले दहावीत जाताना यंदा मोठ्या ...

- डमी - स्टार ८०५

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षी नववी झालेली मुले दहावीत जाताना यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गळती झाल्याचे समोर आले. गेल्या वर्षी (२०१९-२०) नववीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत साधारण अठरा हजारांची तफावत आहे. म्हणजेच इतक्या संख्येने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले.

मागील वर्षी कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले. याचा सर्वाधिक परिणाम हा शिक्षण क्षेत्रावर झाला. एवढेच नव्हे तर कोरोना काळात कामगारांचे झालेले स्थलांतर तसेच गमवाव्या लागलेल्या नोक-यामुळे जवळपास हजारो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले. संसर्गाच्या भीतीने अनेकांनी इयत्ता नववी उत्तीर्ण होवून सुध्दा दहावीत प्रवेश न घेता गॅप घेण्‍याचा निर्णय घेतला. नुकतेच मार्च महिन्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण शिक्षण विभागाकडून करण्‍यात आले होते. त्यावेळी दहा दिवसातील सर्वेक्षणात जिल्ह्यात ५३३ शाळाबाह्य मुले आढळून आली होती. मात्र त्यापुढील म्हणजेच १४ वर्षांपुढील मुलांच्या परिस्थितीची गणती फारशी झालेली नसल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी नववीतील मुले दहावीत जाताना यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गळती झाल्याचे समोर आले. गेल्या वर्षी (२०१९-२०) नववीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत साधारण १८ हजारांची तफावत आहे. म्हणजेच इतक्या संख्येने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले.

बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर

- ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता न आल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला.

- कोरोना काळात भीतीमुळे शहरांतून गावात किंवा एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतरित झालेल्या कुटुंबांमुळे अनेक विद्यार्थ्यांची शाळा आपोआप सुटली.

- ग्रामीण भागात भविष्याविषयी चिंतेतून बालविवाहाची वाईट प्रथा फोफावली. त्यातून अनेक मुलींचे शिक्षण नववीनंतर कुटुंबीयांनीच थांबविले, त्यामुळे हा परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- कोरोनामुळे हाताला काम नाही, कसे बसे कुटूंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यामुळे शाळेची फी कशी भरणार या चिंतेतून काही पालकांनी पाल्याचे प्रवेश काढून घेतले.

तुकड्या टिकविण्‍यासाठी पटसंख्येचा घोळ

नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. पण, तुकड्या टिकविण्यासाठी शाळांकडून अनेक वर्षांपासून अधिक विद्यार्थी प्रवेशित असल्याचे दाखविण्यात येत असते. हा प्रकार ग्रामीण भागांमध्ये अधिक आढळून येतो. एवढेच नव्हे प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत नसतो, पण तो हजेरी पुस्तकावर हजर असतो, हे अनेक वेळा तपासणी आढळून आले आहे. त्यामुळे शाळांमध्ये पटसंख्येचा घोळ असतो, असे शिक्षण तज्ज्ञांनी सांगितले. विशेषत: अनुदानित शाळांमध्ये हा प्रकार अधिक घडतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

कोरोनामुळे मजुर वर्गाचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. याचा परिणाम सुध्दा प्रवेशावर झाला. मार्च महिन्यात राबविलेलया शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात शिक्षणाच्या प्रवाहात नसलेली ५३३ विद्यार्थी शिक्षकांना आढळून आली होती. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे.

- बी.एस.अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

इयत्ता नववी विद्यार्थी (२०१९-२०) : ७६,३५८

दहावी परीक्षेसाठी अर्ज : ५८,३१७