शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सांगा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:14 IST

रिॲलिटी चेक अजय पाटील (डमी ९५०) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून अजूनही निर्बंध कायम ...

रिॲलिटी चेक

अजय पाटील

(डमी ९५०)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून अजूनही निर्बंध कायम ठेवले आहेत. दुपारी ४ वाजेनंतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तर परमिट रूम बीयर बारचालकांनाही दुपारी ४ नंतर केवळ पार्सलसाठी हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, शहरात निर्बंधांच्या वेळेतही अनेक दुकाने, हॉटेल्स लपून-छपून सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे. दुपारी ४ वाजेनंतर आणि शनिवारी व रविवारी वीकेण्ड लॉकडाऊन दरम्यान शहरातील विविध भागांत जाऊन पाहणी केली असता, निर्बंध केवळ नावालाच असून, सर्व दुकाने व हॉटेल्स सर्रासपणे सुरू असल्याचे आढळून आले.

कोरोनाकाळात दुकानदारांवर झालेली कारवाई

पहिल्या लाटेत - २९६

दुसऱ्या लाटेत - ३१०

या दुकानांवर कुणाचे लक्ष?

दुपारी ४ वाजेनंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक नियमित तैनात आहे. पोलिसांचे पथकदेखील कायम आहे. मनपाच्या पथकाकडून आतापर्यंत ६१० दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून सुमारे ५१ लाख रुपयांची वसुलीदेखील मनपा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तरीही शहरात अनेक व्यावसायिक लपून-छपून व्यवसाय करतच आहेत.

सवलत पार्सलची, मात्र सुविधा बसण्याची

शहरातील बीयर बार व परमिट रूम चालकांना निर्बंधाच्या वेळेत केवळ पार्सलची सुविधा देण्याची परवानगी आहे. मात्र, शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावरील एका हॉटेलसह भजे गल्लीतील काही हॉटेल्समध्ये निर्बंधाच्या वेळेनंतरही हॉटेलमध्ये बसूनच जेवण व मद्याची व्यवस्था करून दिली जात आहे. ‘लोकमत’च्या टीमने प्रत्यक्षात जाऊन या ठिकाणी पाहणी केली. यासह अनेक दुकानेदेखील याच काळात सर्रासपणे सुरू असल्याचे आढळून आले.

हे घ्या पुरावे...

१. लोकमतच्या टीमने शहरात पाहणी केली असता, फुले मार्केट परिसरात अनेक दुकाने बाहेरून बंद दिसतात. मात्र, ग्राहक आल्यानंतर शटर उघडून त्या ठिकाणी ग्राहकांना आत घेऊन दुकाने पुन्हा बंद करताना आढळून आले.

२. नवीपेठ व स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातील एका रेस्टॉरंटमध्येही दुपारी ४ वाजेनंतरही ग्राहक थांबून असतात. पार्सलच्या सेवेसह रेस्टॉरन्टमध्ये बसूनदेखील खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आले.

कोट...

मनपाच्या पथकाकडून निर्बंध काळात नियम मोडणाऱ्या ६०० हून अधिक दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५१ लाखांचा दंड वसूल केला आहे. निर्बंध काळात प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या कोणत्याही दुकानदार व व्यावसायिकावर कारवाई ही केलीच जात आहे. नियम पाळण्याचे आवाहन मनपाकडून वेळोवेळी केले जात आहे.

-संतोष वाहुळे, उपायुक्त