शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादांशी गद्दारी करणा-यांना पक्षद्रोहा शिवाय दुसरं काय सुचणार? - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 16:15 IST

ज्यांच्या काकांनी स्व.वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसला त्यांना पक्षद्रोहा शिवाय काय सुचनार,असा घणाघाती आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर केला.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. ८ -   माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना पक्षासोबत द्रोह कधी मान्य नव्हता. ज्यांच्या काकांनी स्व.वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसला त्यांना पक्षद्रोहा शिवाय काय सुचणार? असा घणाघाती आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जळगावात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका खासगी वाहिनीवर बोलतांना स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यासह काही नेते काँग्रेसमध्ये जाणार होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नावाचे वलय पाहून जन्मतारखेत बदल केल्याचा गौप्यस्फोट केला होता, याबाबत विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील सांगितले की, अजित पवार यांना इतक्या वर्षानंतर या घटनेची आठवण कशी झाली. मुळात आता हे सर्वजण सैरभैर झाले आहेत. ज्यावेळी व्यक्ती सैरभैर होतो त्यावेळी तो अशा कथा तयार करतात. अजित पवार यांनी देखील अशीच कथा तयार केली आहे. ज्यांच्या काकांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसला, त्यांना द्रोहाशिवाय काय सुचनार, असा टोला त्यांनी लगावला. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत अजित पवाराचे वक्तव्य हास्यास्पद आहे. मुळात स्व.गोपीनाथ मुंडे इतके छोटे नेते नव्हते.आता सामान्य माणुस हुशार झाला आहे. त्यांच्यापुढे अजित पवारासारखे गोंधळून जातात. त्यामुळे ते काय बोलतात हेच समजत नाही.हार्दिक पटेल आणा की अरविंद केजरीवाल आम्हाला फरक नाहीगुजराथमधील पाटीदार समाजाचे हार्दिक पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबाबत विचारले असता, मुंबई महापालिकेत शिवसेनेला फटका बसणार आहे. त्यामुळे ते हादरले आहेत. हार्दिक पटेल यांना शिवसेनेत प्रवेश देऊन ते खेळी करीत आहेत. शिवसेनेने हार्दिक पटेल यांना आणावे नाही तर अरविंद केजरीवाल यांना आम्हाला विशेष फरक पडणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सेनेचे मतदभेद दूर करण्यासाठी मी आहे, सर्व बरोबर करेनशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता सेना व भाजपा हे एका विचाराचे पक्ष आहेत. काळाच्या ओघात दोघांच्या वेगवेगळ्या चुली झाल्या. सेना व भाजपामधील भांडण हे कुटुंबातील आहे. सेना व भाजपात मतभेदच आहेत, मनभेद नाही. आणि झालेले मतभेद दूर करण्यासाठी मी आहे, सर्व ठीक करेन असे त्यांनी सांगितले.