शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

दत्तक घेतलेल्या नाशिकला बोंब पाडली नाही, जळगावात भाजपा काय विकास करणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:45 IST

दादा भुसे यांचे टिकास्त्र

ठळक मुद्देसुरेशदादांना त्रास देणाऱ्यांना धडा शिकवा-खोतकरसुरेशदादांचे ‘नाम ही काफी है’

जळगाव : नाशिक मनपाच्या निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतल्याचे जाहीर केले होते. तसेच विकासासाठी २०० कोटी रुपये देवू असे आश्वासन दिले होते. मात्र, आज वर्ष संपल्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या विकासासाठी एक रुपया दिला नाही. दत्तक घेतलेल्या नाशिकचा विकास ते करु शकले नाही. तर जळगाव शहराचा काय विकास करतील, असा सवाल ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी येथे केला.शिवसेनेच्या उमेदवारांसाठी रविवारी रात्री ८ वाजता गणेश कॉलनी चौकात आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह प्रभागातील सर्व शिवसेनेचे व पुरस्कृत उमेदवार उपस्थित होते. संजय सांवत यांनी भाजपाला चांगलेच धारेवर धरत भाजपाचे जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्यावर चांगलीच टीका केली.सुरेशदादांचे ‘नाम ही काफी है’भाजपच्या जुमल्यांमध्ये किंवा त्यांच्या फेकमफाक मध्ये न अडकता सुरेशदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहराचा विकास करून घ्या असेही दादा भुसे म्हणाले. शहराच्या विकासासाठी सुरेशदादांचे केवळ ‘नाम ही काफी है’ असे भुसे यांनी सांगितले.सुरेशदादांना यातना देणाºयांना जळगावकर धडा शिकवतील!सुवर्णनगरी, व्यापार नगरी, केळीची नगरी अशी ओळख जळगावची राज्यात असून ही ओळख केवळ सुरेशदादा जैन यांनी निर्माण केली आहे. त्यांनी शहराचा विकास केल्यावर देखील राजकारणातील काही अपप्रवृत्तीने त्यांना बदनाम करण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, त्यातून सुरेशदादा सुखरुप निघाले.सुरेशदादा यांना यातना देणाºयांना जळगावकर या निवडणुकीत धडा शिकवतील असेही अर्जुन खोतकर म्हणाले.योगेश पाटील यांना अडविलेदरम्यान, सभा सुरु होण्याआधी प्रभाग ७ ड मधील उमेदवार योगेश पाटील यांनी व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव