शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कु:हाड येथील पाणीप्रश्न पेटला

By admin | Updated: April 15, 2017 00:35 IST

ग्रामस्थांचा मोर्चा : सरपंचाच्या घरासह ग्रामपंचायतवरही धडकले

कु:हाड, ता.पाचोरा : पाणीटंचाईने त्रस्त आणि संतप्त झालेल्या येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी सरपंचाच्या घरी व त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली. दहा हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या कु:हाड खुर्द येथे गेल्या पंधरा दिवसांपासून नळांना पाणी येत नसल्याने व या परिसरात कोणतेही जलस्नेत नसल्यामुळे गावक:यांना पिण्याच्या पाण्यासाठी रानावनात भटकंती करावी लागत आहे. यास वैतागून 14 रोजी सकाळी 6 वाजता अचानक गावातील हजारोंचा जमाव सरपंच अख्तर हुसेन कहाकर यांच्या घरी व नंतर ग्रामपंचायतीवर धडकला.  या वेळेस संतप्त ग्रामस्थांची प्रचंड गर्दी जमा होऊन तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. घराजवळ मोठय़ा संख्येने लोक जमल्याने सरपंच काही वेळातच ग्रामपंचायत कार्यालयात आले, त्यामुळे जमाव त्यांच्या पाठोपाठ आला. सरपंचाशिवाय ग्रामपंचायतीत कोणीच नसल्याने त्यांच्या अंगावर काही लोक धावून गेल्याचा प्रकार घडल्याने प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काही वेळेतच ग्रामसेवक पी.ए. चव्हाण हे आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.   दरम्यान, निर्माण झालेली ही परिस्थिती लक्षात घेता ग्रा.पं. पाणी पुरवण्यास अपयशी ठरत आहे, ही बाब मान्य करीत सरपंच व ग्रा.पं. सदस्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली.  ग्रामस्थांना पिण्यास पाणी न मिळाल्यास ग्रा.पं.वर मोर्चा काढण्यात येण्याची शक्यता असल्याचे इशारावजा वृत्त पंधरा दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने  प्रसिद्ध  केले होते. तथापि ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली नाही. दरम्यान, या परिसरातील धरणे कोरडीेठाक पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याकरिता गावाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्यासाठी बहुळा धरणच पर्याय आहे, असे सरपंचांनी सांगितले. दरम्यान, धरणातील पाणीपुरवठा करणा:या विहिरी खोलीकरणाचे काम लवकरच हाती घेत असल्याचे सांगून ग्रामस्थांची समजूत घालण्यात आली.                                             (वार्ताहर)