शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बहुप्रतीक्षित विमानसेवेची स्वप्नपूर्ती, जळगाव-मुंबई विमानसेवेचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:42 IST

पहिल्याच दिवशी अडीच तास विलंब

ठळक मुद्दे दुस-या टप्प्यात राज्यातील आणखी 5 शहरांमध्ये विमानसेवास्वप्न झाल्याचा आनंद

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23- बहुप्रतीक्षित अशा विमानसेवेची शनिवारी स्वप्नपूर्ती झाली. जळगाव ते मुंबई हे प्रवासी विमान जळगाव विमानतळावर दुपारी 3.48 वाजता पोहचताच जळगावकरांनी जल्लोषात स्वागत केले. पहिल्याच दिवशी विमानाला अडीच तास विलंब झाला. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिक ताटकळले होते.  कंटाळलेले काही लोकप्रतिनिधी शुभारंभापूर्वीच विमानतळावरुन रवाना झाले.गेल्या अनेक वर्षापासून जळगावकरांचे विमानसेवेचे स्वप्न होते. अखेर शनिवार, 23 रोजी जळगावकरांची स्वप्नपूर्ती झाली. मुंबई ते जळगाव हे एअर डेक्कनच्या विमानाचे शनिवारी दुपारी 1.15 वाजता आगमन होणार होते, ते तब्बल अडीच तास म्हणजेच 3.48 वाजता जळगाव विमानतळावर पोहचले. मुंबई विमानतळावर स्लॉट न मिळाल्याने विमानास विलंब झाला.  या विमानातूनच आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते हिरवी ङोंडी दाखवून विमानसेवेचा शुभारंभ झाला. यावेळी एअर डेक्कनचे संचालक कॅप्टन जी.आर. गोपीनाथ, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए.टी. पाटील, महापौर ललित कोल्हे, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्‍जवला पाटील, जैन उद्योग समुहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, विमानतळ विकास प्राधिकरणचे महाव्यवस्थापक विकास चंद्रा यांच्यासह एअर डेक्कनचे अधिकारी व शहरातील उद्योजक, व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.राज्यातील 15 लहान शहरांमध्ये विमानसेवासर्वसामान्यांना विमानाद्वारे प्रवास करता यावा, यासाठी केंद्र शासनाच्या उडान या योजनेद्वारे महाराष्ट्रातील जळगावसह 10 शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात विमानसेवा सुरु होत आहे. शनिवार, 23 रोजी जळगावातून विमानसेवेचा प्रारंभ झाला. दुस-या टप्प्यात राज्यातील आणखी 5 शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

भवरलाल जैन व माङो विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाले..जळगावात आज विमानसेवेचा शुभारंभ झाला. मुंबई येथे जाण्यासाठी जळगावातून दररोज एक विमान असेल. वर्षभरानंतर दोन विमाने सोडण्यात येतील. सर्वसामान्यांना विमानसेवा मिळावी ही जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन व माङो स्वप्न होते. ते आज पूर्ण झाल्याचा आनंद यावेळी एअर डेक्कनचे संचालक कॅ.गोपीनाथ यांनी व्यक्त केला. जळगाव सारख्या लहान शहरांमध्ये विमानसेवा सुरु होण्यासाठी मुंबई विमानतळावर 25 टक्के रिजनल कनेक्टीव्हीटी मिळणे आवश्यक आहे. ती मिळाल्यास राज्यभरातील अनेक शहरांमध्ये विमानसेवा सुरु करता येईल, असेही कॅ.गोपीनाथ यावेळी म्हणाले.