अमळनेर : येथील बोरी नदी वरील गांधलीपुरा भागाकडील पुलाच्या खाली बिनबोभाटपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी अमळनेर पोलिसांनी गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास धाड टाकून तेथील तात्पुरत्या उभारण्यात आलेले आडोसे उद्ध्वस्त केले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक केले जात आहे.बोरी नदीवर उभारण्यात येत असलेला हा पूल वापरात नसला तरी गेल्या काही महिन्यांपासून पुलाच्या खाली खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू होता. मुख्य पुलावरून सदर किळसवाणा प्रकार दिसत होता. तरीही तो बिनदिक्कतपणे सुरू होता. मात्र गुरुवारी दुपारी अचानक पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकातील विजय साळुंखे, रवि पाटील, योगेश महाजन,मिलिंद बोरसे, आणि सुनील पाटील यांनी धाड टाकताच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि ग्राहक बेभान पळत सुटले. यावेळी पोलिसांनी त्याठिकाणी उभे करण्यात आलेले आडोसे आणि इतर साहित्य उद्ध्वस्त केले.
ंअमळनेरात वेश्या व्यवसायावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:46 IST
अमळनेर येथील बोरी नदी वरील गांधलीपुरा भागाकडील पुलाच्या खाली बिनबोभाटपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी अमळनेर पोलिसांनी गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास धाड टाकून तेथील तात्पुरत्या उभारण्यात आलेले आडोसे उद्ध्वस्त केले.
ंअमळनेरात वेश्या व्यवसायावर धाड
ठळक मुद्देधाड टाकताच वेश्या व्यवसाय करणाºया महिला आणि ग्राहक सुटले पळत बिनदिक्कतपणे सुरू होता वेश्या व्यवसाय