शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर येथील प्रिया नाहाटा वैराग्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:12 IST

जामनेर येथील २७ वर्षीय कन्या प्रिया नाहाटा ही ३१ डिसेंबर रोजी नाशिक येथे जैनधर्माची दीक्षा घेत आहे.

ठळक मुद्देजामनेरमध्ये निघाला भव्य वरघोडा३१ डिसेंबर रोजी नाशिक येथे घेणार जैन दीक्षा२७ वर्षीय प्रियाने नाहाटा परिवाराचे नाव केले रोशन

वाकोद/जामनेर, जि.जळगाव : जामनेर येथील व्यापारी सुभाषचंद तथा पुष्पा नाहाटा यांची २७ वर्षीय कन्या प्रिया नाहाटा ही ३१ डिसेंबर रोजी नाशिक येथे जैनधर्माची दीक्षा घेत आहे. तत्पूर्वी दीक्षार्थी प्रिया नाहाटा हिचा शेकडो जैन बांधवांच्या उपस्थितीत जामनेर येथे गुरुवारी भव्य वरघोडा (मिरवणूक) काढण्यात आला.प्रिया नाहाटा ही शिक्षित असून इंटेरीअर डेकोरेटर पदवी प्राप्त केली आहे. वयाच्या १३ तोव्या वर्षापासून जैन साधू-संतांच्या सहवासात आहे. २०१२ मध्ये प. पू. सरिताश्री म. सा. यांच्या चातुमार्सामध्ये वैराग्याची भावना उत्पन्न झाली. तेव्हापासून ती सरिताश्री म. सा. यांच्या संपर्कात होती. जैन धर्मियांची शिकवण व जैन संतांच्या विचाराचा प्रभाव बालवयापासून पडत गेल्याने प्रिया हिची अंतिमत: जैन दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. ३१ डिसेंबर रोजी जैन धर्मियांच्या हजारो जनमुदायाच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे प्रिया हिचा दीक्षा विधी होत आहे.जैन संत व साध्वींच्या उपस्थित भव्य वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. वरघोडा मिरवणुकीत घोडे, सुभेदार पथक, ढोल ताशाचे पथक नेत्रदीपक ठरत होते. मिरवणुकीत आकर्षक रथावर स्वार झालेल्या प्रिया व तिच्या आई-वडिलांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.सकाळी ८ वाजता गिरिजा कॉलनी येथील राहत्या घरून मिरवणुकीला सुरुवात झाली तर पाचोरा रोडवरील तुलसी नगर येथे सांगता होऊन यावेळी बांधवांतर्फे प्रिया यांच्या आई-वडिलांचा सन्मान करण्यात आला.माजी खासदार ईश्वरलाल जैन, संघपती दलीचंद जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रिया आज बिदाई होणार असून गृहत्याग करणार आहे.नाहाटा परिवाराचे नाव केले रोशनप्रिया नाहाटा ही शिक्षित आहे. लोकांचे घर सजविता सजविता प्रिया ही आपल्या सांसारिक जीवनात मोठे पाऊल उचलत संसाराचा त्याग करण्याचा मार्ग अवलंबविला. एवढेच नव्हे तर आपल्या परिवाराचे नावदेखील रोशन केले. अवघ्या वयाच्या २७ व्या वर्षी घर, संसार या सगळ्या गोष्टींचा त्याग करीत आहे हे विशेष. प्रियाला तुषार आणि लोकेश हे दोन भाऊ आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमJamnerजामनेर