शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

397 भूखंड ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 11:25 IST

शासनाकडून मनपाचा ठराव निलंबित : खुल्या भूखंडांचा वापर नियमबाह्य झाल्याने घेतला निर्णय

ठळक मुद्दे एकूण 397 खुल्या जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव 29 एप्रिल 2017 च्या महासभेतआला होतासंस्थांनी करारनामा अटीशर्तीचा भंग केला असल्याने या जागा रद्द करण्यात याव्यात असा निर्णयही त्यापूर्वी झालाएक वर्षाच्या आत जागा विकसित करण्याची संधी देण्यात यावी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - महापालिकेने उदात्त हेतूने दिलेल्या खुल्या भूखंडांचा वापर हा  नियमबाह्य होत असल्याची माहिती मनपा प्रशासनाने शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविली होती. ही बाब लक्षात घेऊन 397 जागांबाबतचा ठराव शासनाने निलंबित केला असून त्याबाबतचे पत्र आज मनपाला प्राप्त झाले. त्यामुळे आता या जागा मनपाला ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. महापालिका हद्दीतील मंजूर अभिन्यासातील खुल्या जागा  तत्कालीन नगरपालिका व मनपाच्या कार्यकाळात विविध संस्थांना सार्वजनिक वापर व स्थानिक रहिवाशांना उपयोगात येईल या उद्देशाने वितरित करण्यात आल्या होत्या.विविध संस्थांना दिलेल्या जागांबाबत नगर विकास विभागाने 10 जून 1996 मध्ये नमूद केलेल्या अटी, शर्तीचा भंग झाल्याने 184 अविकसित व 213 विकसित अशा एकूण 397 खुल्या जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव 29 एप्रिल 2017 च्या मनपा महासभेत ठराव क्रमांक 632 ने चर्चेसाठी आला होता. ठराव क्रमांक 251 हा 20 जून 2015 अन्वये मंजूर केलेल्या ठरावानुसार ज्या संस्थांनी खुल्या जागा विकसित केल्या नाहीत अशा संस्थांनी करारनामा अटीशर्तीचा भंग केला असल्याने या जागा रद्द करण्यात याव्यात असा निर्णयही त्यापूर्वी झाला होता. त्यानुसार 184 अविकसित खुल्या जागा ताब्यात घेण्यास मान्यताही देण्यात आली होती.  त्यावर 29 जून 2017 रोजीच्या महासभेत 213 संस्थांना दिलेल्या  विकसीत जागांचा ठराव रद्द करण्याबाबत प्रस्ताव महासभेत आला  तो महासभेने फेटाळला होता. जे ओपन स्पेस संबंधित संस्थांनी ताबा दिल्यानंतरही व करारनाम्याप्रमाणे अधिन राहून शेवटची संधी म्हणून 6 महिन्यांची मुदत देण्यात यावी. या कालावधित संबंधित संस्थांनी जागा नियमांच्या तरतुदीनुसार व करारनाम्यातील अटी शर्तीस अधिन राहून परिपूर्ण विकसित करणे बंधनकारक करण्यात यावे. या संस्थांनी तीन महिन्यात प्रगती अहवाल सादर न केल्यास अशा जागा महापालिकेने ताब्यात घ्याव्यात परंतू ज्या संस्थांना जागा देण्याचा ठराव होऊनही जागा त्या संस्थांना ताब्यात दे:यात आलेल्या नाहीत किंवा त्यांच्याशी करारनामादेखील करण्यात आलेला नाही अशा संस्थांनादेखील कायदेशिर पूर्तता पूर्ण करून एक वर्षाच्या आत जागा विकसित करण्याची संधी देण्यात यावी, असा ठराव केला होता.