शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मन्याड धरण भरण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 23:27 IST

२२ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला : मन्याड आणि गिरणाला पूर येण्याच्या भीतीने सतर्कतेचा इशारा

चाळीसगाव / आडगाव : मन्याड धरणाच्या वरील क्षेत्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने हे धरण ९० टक्के भरले आहे. लवकरच हे धरण पूर्ण भरुन धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्याने मन्याड तसेच गिरणा नदी काढावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मन्याड नदी ही सायगाव येथून जात असल्याने गिरणा नदीसही केव्हाही पूर येऊ शकतो. यामुळे नांन्द्रे, अलवाडी, सायगाव, पिलखोड, प्रिंपी, टाकळी प्र. दे, उंबरखेड, डोण, ब्राम्हणशेवगे आदी गावे या नदीच्या काठावर असल्याने या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान धरण भरल्याने परिसरातील २२ गावांना शेती व पिण्याच्या प्रश्न अवलंबून आहे. हा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.पाटबंधारे विभागाने आत्तापासूनच नियोजन करावेगेल्या वर्षी परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झाले व धरणही भरले डिसेंबर/जानेवारी पर्यंत विहिरींचे पाणी पुरेल म्हणून शेतकºयांनी पाटबंधारे विभागाला संक्रात नंतर पहिले आवर्तन सोडण्याचे सुचवले होते. परंतु गेल्या दोन/तीन वषार्पासून रिकामा असलेला पाट व त्यात वाढलेले गवत आणि काटेरी झुडूपे वेळेवर मजूर मिळत नसल्याने घाईगर्दीत झालेली पाटाची साफसफाई आदीमुळे २१ ते २२ जानेवारीला पहिले आवर्तन सोडले असता मध्येच वांद्रे गावाजवळ पाटफुटला. त्यामुळे दुरूस्ती साठी पुन्हा पाट ९ते १० दिवसासाठी बंद करावा लागला त्यामुळे १५ जानेवारीला सुटणारे आवर्तन फेब्रुवारीच्या पहिल्या आठड्यात सोडण्यात आले. यामध्ये विहिरीं एकदम आटल्या. सर्व शेतकरी पाणी पाणी करू लागले. शेतकºयांना दुसरे आवर्तन देतांना खुप उशीर झाला त्यामुळे पाणी असूनही निव्वळ नियोजनाअभावी हातचा हंगाम वाया गेला. ही चुक पूंन्हा होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने आत्तापासूनच पाटाची साफसफाई करून हंगामी कर्मचारी वाढवून घ्यावे व धरणांतील सांडव्याद्वारे वाया जाणारे पाणी पाटचारींना सोडावे अशी मागणी होऊ लागली आहे.