शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धरणांमधून सोडले तापी, बोरी व पांझरा नदीत पाणी, नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:09 IST

पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यांना लाभ

ठळक मुद्देधरणास गळती असल्याने ते थांबत नसल्यामुळे  पाणी पूर्ण वाहून जातेलहान बंधायार्ची दुरुस्ती करण्याची मागणी बोरी नदी, तापी नदी, पांझरा नदी वाहू लागल्याने बहुतेक गावांचा  प्रश्न सुटणार आहे

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 14 - हतनूर धरणातून तापी नदीत, अक्कलपाडा  धरणातून  पांझरा नदी आणि तामसवाडी धरणातून बोरी नदीत पाणी सोडण्यात आल्याने टंचाईग्रस्त अमळनेर तालुक्याला खूप मोठा दिलासा मिळून नदीकाठावरील गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी मार्गी लागणार आहे .धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पिण्यासाठी नुकतेच पाणी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसात धरण क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्यमुले धरनात यावर्षी साधारण 60टक्क्यांवर पाणी साठा आहे .धरणाच्या डाव्या कालव्यातुण पाणी सोडण्यात आले आह त्यामुळे .पांझरा काठावरील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सुटन्यास मदत होणार आहे .पांझरा नदी धुळे तसेच जळगाव जिल्ह्यातून वाहत असल्याने धुळे अंमळनेर सिंधखेडा या तीन तालुक्यातील गावाना पिण्यासाठी तसेच शेती साठी फायद होणार आहे .यामुळे  पाणी पातळी वाढण्यात मदत होणार आहे .      न्याहळोद , कवठळ, वालखेडा, जापी शिरडाने, कंचनपूर, मांडळ, वावडे, मुडी, बोदर्डे, लोण बु., लोण खु., लोण चारम, भरवस, बेटावद, भिलाली, शाहापूर, तांदळी इत्यादी गावांना फायदा होणार आहे .त्याचप्रमाणे तामसवाडी धरणातून बोरी नदीत पाणी सोडण्यात आल्याने बहादरपूर, कोळपिंप्री, फापोरे, कन्हेरे, शिरुड, मंगरूळ, तासखेडा, अमोडे, नंदगाव, अंतुर्ली रंजाने, मुडी दरेंगाव, करणखेडे, अंबारे , खापरखेडा आदी गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे.  तापीलाही पाणी सुटल्याने पाडळसरे धरणात पाणी साठा, तसेच कलाली डोह व जळोद  गंगापुरीडोह भरल्याने शहरासह तापी काठावरील गावच्या विहिरींची पाणी पातळी वाढून पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहेअमळनेर तालुक्यात 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याने 23 गावांना पाणी टंचाई असून टँकर सुरू आहेत टँकर कोठून भरावेत असा  प्रश्न प्रशासनाला पडला होता परंतु तालुक्याच्या तिन्ही दिशांना असलेल्या बोरी नदी, तापी नदी, पांझरा नदी वाहू लागल्याने बहुतेक गावांचा  प्रश्न सुटणार आहे   परंतू पांझरा नदीवर असलेले वालखेडा कळबू बाम्हने हे लहान बंधायार्ची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कारण सुटलेले पाणी हे धरणास गळती असल्याने ते थांबत नसल्यामुळे  पाणी पूर्ण वाहून जाते त्यामुळे लोकप्रतिनिधीनी  लक्ष देण्याची मागणी होत आहे ज्यामुळे या पाण्याचा अधिक काळ फायदा होईल .