शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात ८८ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:09 IST

वाढत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रताही वाढतच आहे. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबवून टंचाईग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. तातडीची उपाययोजना म्हणून ८८ गावांमध्ये ५५ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.

ठळक मुद्देअमळनेर तालुक्यात सर्वाधिक ४३ गावांना टँकरने पाणी १५९ विहिरींचे अधिग्रहण करून १६० गावांची तहान भागविली जात आहेपारोळा तालुक्यात १५ गावांमध्ये पाणी टंचाई निवारणार्थ विविध उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : वाढत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रताही वाढतच आहे. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबवून टंचाईग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. तातडीची उपाययोजना म्हणून ८८ गावांमध्ये ५५ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. तर १५९ विहिरींचे अधिग्रहण करून १६० गावांची तहान भागविली जात आहे.सध्याच्या आकडेवाडीनुसार अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ४३ गावांना टँकरने पाणी पोहचवावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार अमळनेर तालुक्यातील ४३ गावांमध्ये तर त्या खालोखाल जामनेर तालुक्यात २२, पारोळा तालुक्यात १५ गावांमध्ये पाणी टंचाई निवारणार्थ विविध उपाय योजले आहेत.पाणी टंचाईवर उपाय म्हणून जिल्ह्यातील ९७ गावांमध्ये २५७ विंधन विहिरी करण्यात आल्या. तालुकानिहाय संख्या अशी आहे. कंसात गावांची संख्या दर्शविली आहे. जळगाव- ५१ (१८), धरणगाव- ५८ (२४), एरंडोल- १५ (१), भुसावळ - २७(१०), यावल-२ (१), रावेर- ८ (७), मुक्ताईनगर- २ (२), बोदवड- १३ (५), पाचोरा- ५० (१६), अमळनेर - ३ (२), पारोळा- १० (५), चोपडा- १८ (६).