शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओझर गावात १५ दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: February 9, 2017 00:21 IST

दीड कोटी पाण्यात : निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी

चाळीसगाव : तालुक्यातील  ओझर  येथे पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ६४ लाख रुपये खर्च करण्यात आले. एवढी मोठी रक्कम खर्चूनही अनेक दिवसांपासून १५-२० दिवसाआड गावाला पाणीपुरवठा केला जात आहे.  या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची फेब्रुवारी महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.  पाणीपुरवठा योजनेची चौकशी करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. यापूर्वी गावात जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत २ ते ३ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. स्वत:ची पेयजल योजना कार्यान्वित झाल्यामुळे मुबलक पाणी मिळेल अशी नागरिकांना आशा होती. परंतु ही योजना पूर्णपणे कुचकामी ठरली आहे.  दर्जानुसार काम न होता ठिकठिकाणी पाईप लाईन लिकेज होणे, दूषित पाणी मिळणे या सर्व कारणांमुळे ही योजना ठप्प झाली. कोट्यवधी रुपये खर्चूनही हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्यातही पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.सध्या नदीपात्रात शेवड्या खोदून पाणीपुरवठा करवा लागत आहे.  उन्हाळ्यात ही परिस्थिती अधिक तीव्र होणार आहे. याबाबत पाणीपुरवठा योजना अध्यक्ष व सचिव यांच्या कामकाजाची चौकशी करावी व नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे. संबंधित ठेकेदाराने केलेल्या चुकीच्या कामाची ग्रामपंचायतीलादेखील पुरेपूर जाण आहे. परंतु ग्रामपंचायतीने अद्यापही ही पेयजल योजना ताब्यात घेतली नाही. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणी मनोज धावजी जाधव, सुदाम सुका खैरे, शांताराम दौलत पगारे यांच्यासह अनेक नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबवावी व संबंधित कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अन्यथा तीव्र  आंदोलन छेडले जाईल, असा  इशाराही ओझर ग्रामस्थांकडून निवेदनात देण्यात आला आहे. (वार्ताहर)पाणीपुरवठा योजनेचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पाइपाचा दर्जा अतिशय हलका असल्याने सातत्याने ठिकठिकाणी पाणी गळती होते. याचा परिणाम गावाला दूषित पाणीपुरवठा होत आहे. पुन्हा पुन्हा दुरुस्ती करावी लागते. २ कोटी रुपयांची योजना कार्यान्वित असताना नगरपालिकेच्या विहिरीवरून मोठ्या प्रमाणावर रक्कम खर्चून पुन्हा पाईप लाईन टाकण्यात आली. पेयजल योजनेच्या विहिरीवर आडवी बोअर करणे, तसेच गिरणा नदीवर शेवडी खोदकाम करणे असा अनाठायी खर्च ओझर ग्रामपंचायतीतर्फे केला जात आहे. या सर्व खर्चाची चौकशी करावी, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.