शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

4 महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत

By admin | Updated: February 13, 2017 00:59 IST

कजगावातील स्थिती : कमी दाबाच्या वीजपुरवठय़ामुळे अडथळा, दखल घेण्याची गरज

कजगाव, ता.भडगाव : गावातील  पाणीप्रश्न 3-4 महिन्यांपासून बिकट झाला आहे. 15 ते 20 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विहिरीला पाणी असूनही कमी दाबाच्या वीजप्रवाहामुळे वीजपंप चालत नसल्याने पाणीपुरवठा योजना बंद स्थितीत पडली आहे.कजगावची पाणीपुरवठा योजना सावदेजवळील गिरणा नदीतून कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी योजनेची विहीर आहे. अगोदर या योजनेस कजगाव सबस्टेशनवरून वीजपुरवठा होता. दरम्यान चार-पाच महिन्यांपूर्वी लोणपिराचे येथील नवीन सबस्टेशनवरून सुरू झाल्याने कजगाव योजनेचा पाणीपुरवठा लोणपिराचे सबस्टेशनला जोडण्यात आला आणि तेव्हापासून कजगावच्या पाणीपुरवठा योजनेची घरघर सुरू झाली.कमी दाबाचा वीजपुरवठापाणीपुरवठा योजनेसाठी 35 एचपी पंप बसविण्यात आला आहे. या पंपास साधारणत: 380 ते 400 होल्टेजचा वीजपुरवठा अपेक्षित असतो तेव्हाच वीजपंप सुरळीत चालतो. मात्र या ठिकाणी जेमतेम 250 होल्टेजचा पुरवठा सुरू असल्याने 35 एचपीचा पंप सुरूच होत नसल्याने या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.वीजपुरवठा सुरळीत होणे गरजेचेकजगावची पाणीपुरवठा योजना केवळ कमी दाबाच्या वीजपुरवठय़ामुळे बारगळली आहे. यामुळे गावाला 20-20 दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. वीज कंपनीने त्वरित तांत्रिक दोष दूर करून वीजपुरवठा सुरळीत करावा.लोण सबस्टेशनलाच कमी दाबाचा वीजपुरवठालोण सबस्टेशनवरून गेल्या 4-5 महिन्यांपूर्वी कजगाव योजनेचा पुरवठा जोडण्यात आला. मात्र कमी दाबाच्या वीजपुरवठय़ामुळे योजनेचा पंपच सुरू होत नसल्याने संबंधित सबस्टेशनला अनेक वेळा विचारणा केली असता सबस्टेशनलाच कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच लोण सबस्टेशनवरून कजगाव योजनेचा सुरळीत वीजपुरवठा मिळू शकणार नसल्याचे दिसते.ग्रा.पं.कडून 100 एचपीचाट्रान्सफॉर्मर देण्याची मागणीसतत कमी दाबाच्या वीजपुरवठय़ामुळे कजगावचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे. तो सुटावा यासाठी सदर योजनेचा जेथून कार्यान्वित आहे तेथील 35 एचपीचा ट्रान्सफॉर्मर बदलवून या ठिकाणी 100 एचपीचा ट्रान्सफॉर्मर देण्यात यावा अशी मागणी कजगावच्या सरपंच लताबाई निकम यांनी वीज वितरण कंपनीकडे रीतसर पत्र देऊन केल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी आर.पी. सोनवणे यांनी दिली.42 भागात विभागून पाणीपुरवठाकजगावचा तीन विभागात पाणीपुरवठा विभागला आहे. यात स्टेशन विभागात 3 भाग, बसस्थानक ते स्टेशन 12 भाग व बसस्थानक 15 भाग आणि जुने गाव 12 भाग अशा एकूण 42 भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र योजनेचा वीजपंपच सुरळीत चालत नसल्याने सध्या एका भागास पाणी पोहचण्यासाठी जवळपास 25 ते 30 दिवस लागत असल्याने कजगावचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे.आमदारांनी लक्ष द्यावेकजगावचा पाणीप्रश्न केवळ कमी दाबाच्या वीज समस्येमुळे बिकट झाला आहे. तो सोवण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी संबंधित खात्याच्या वरिष्ठांना योग्य त्या कडक सूचना देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबतचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.वीजपुरवठा पुन्हा कजगावहून जोडावाकजगाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा लोण सबस्टेशनवरून सुरळीत होत नसल्याने तो वीजपुरवठा कजगाव सबस्टेशनवरून जोडण्यात यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.कजगावच्या पाणीपुरवठा योजनेस सुरुवातीपासूनच अडथळे आले आहेत.  सदर योजनेच्या विहिरीला दगड लागल्याने गिरणेस पाणी तरच योजनेच्या विहिरीस पाणी अशी स्थिती आहे. जेव्हा गिरणा वाहते तेव्हा कधी पाईप  गळती होते, तर कधी वीजपंप जळतो, कधी भारनियमन, तर कधी लाईनीत बिघाड असतो. आता तर चक्क चार महिन्यांपासून कमी दाबाचा वीजपुरवठा आणि जेव्हा गिरणेला पाणी नाही तेव्हा विहिरीला पाणी नाही. म्हणजेच कजगावच्या पाणीपुरवठा योजनेला अनेक अडथळे. यालाच म्हणतात नकटीच्या लग्नात..नागरिकांचा इशाराकमी दाबाच्या वीजप्रवाहामुळे कजगावकरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीपुरवठा योजना सुरळीत व्हावी याकरिता वीजपुरवठा सुरळीत करावा. सदरचा पुरवठा 16 फेब्रुवारीर्पयत सुरळीत न झाल्यास 25 रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रा.पं. सदस्य अनिल महाजन व युवा कार्यकत्र्यानी लोणपिराचे येथील सबस्टेशनला निवेदन देऊन दिला आहे.