शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोलकरांवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:19 IST

महिनाभर पुरेल एवढाच साठा : पर्यायी व्यवस्था करण्याचे पाटबंधारे विभागाचे पालिकेला निर्देश

ठळक मुद्देपावसाळ्याच्या दिवसांमध्ये एरंडोल पालिकेतर्फे शहराला दर पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.अंजनी धरणातील संपुष्टात येणाºया मार्गावरील जलसाठा लक्षात घेऊन एरंडोल पालिकेने पाणीकपात केली आहे. अन्यथा पूर्वी तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत होता.‘अंजनी’ धरण हे एरंडोल तालुक्यासाठी वरदान ठरले आहे. २००८ पासून धरणात पाणीसाठा निर्मिती झाली. गेल्या १० वर्षात फक्त चार वेळा धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला.

एरंडोल, जि.जळगाव : एरंडोल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंजनी धरणात एक महिना पुरेल एवढाच मृत पाणीसाठा शिल्लक आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने एरंडोलकरांवर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश गिरणा पाटबंधारे विभागाने पालिकेला दिले आहेत.अंजनी धरणातील जलाशयात ०.५९२ द.ल.घ.मी. एवढाच पाणीसाठा सद्य:स्थितीत उपलब्ध आहे. एरंडोल शहराला रोज होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता एखाद्या महिनयापर्यंत पाणीपुरवठा होणे शक्य आहे. भविष्यात पाऊस न पडल्यास धरणातील पाणीसाठा संपुष्ठात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.‘अंजनी’च्या जलसाठ्यातून एरंडोलसाठी ६० द.ल.घ.फू. व कासोद्यासाठी १५ द.ल.घ.फू. एवढे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. परंतु धरणात पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्यामुळे यावर्षी पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून २० द.ल.घ.फू. पाण्याचा साठा जामदा डाव्या कालव्यामार्फत पुनर्भरण करून साठा करण्यात आला. त्यामुळे एरंडोल व कासोदा या मोठ्या गावांना पाणीटंचाई मुक्त करण्यात आले.विशेष हे की, जवळपास गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून ‘अंजनी’च्या मृत साठ्यातून एरंडोलला पाणीपुरवठा होत आहे.या धरणाचे पाणलोट क्षेत्र २३४.३४ चौ.कि.मी. आहे. अंजनी नदीचा उगम पारोळा तालुक्यातील चोरवड, शिरसमणी परिसरातून होतो. १५ ते २० छोटे-मोठे नाले या नदीला मिळतात.सर्वांत मोठा नाला लोणी बुद्रूक व लोणी खुर्द गावांमधला आहे. अंजनी धरणाचे ६० टक्के पाणलोट क्षेत्र पारोळा तालुक्यात व ४० टक्के एरंडोल तालुक्यात आहे. जवळपास १६० कोटी रूपये खर्च पाण्यासारखा या प्रकल्पावर झाला. पण तरीसुद्धा या धरणाला ड्रिंकींग वॉटर टँकचे स्वरूप प्राप्त झाले आहे.२०१३ मध्ये अंजनी धरणाच्या जलाशयाचे पाणी नदी पात्रात सोडण्याच्या प्रयत्नाला सर्वपक्षीय नेत्यांनी प्रखर विरोध केला होता. पाणी सोडले असते तर एरंडोल शहराला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले असते.तर भयावह स्थितीदरम्यान, दरवर्षी पावसाची कमतरता, अपुरा पाऊस या कारणामुळे धरणात पूर्ण क्षमतेने जलसाठा होत नाही म्हणून पाणीटंचाई निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण होते.‘लोकमत’ वृत्ताची दखल१२ जुलैच्या ‘लोकमत’मध्ये एरंडोल शहराच्या संभाव्य पाणीटंचाईबाबत वृत्त प्रसिद्ध झाले. त्या वृत्ताची दखल घेऊन गिरणा पाटबंधारे उपविभागाने पालिकेला तत्काळ पत्र पाठवून पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईErandolएरंडोल