शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

 जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे असताना महाराष्ट्राचे पाणी गुजरातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:28 IST

कोळगाव येथील सभा :  छगन भुजबळांचा  गिरीश महाजनांवर हल्लाबोल

भडगाव/ खेडगाव/गुढे : ज्या राज्याच्या जमिनीवर पावसाचे पाणी पडेल ते त्या राज्यालाच मिळायला हवे, असे आपल्या आघाडी सरकारच्या काळातील धोरण असताना महाराष्टÑाच्या हक्काचे पाणी गुजरातला जातेय... तेही या जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री असताना, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री  छगन भुजबळ यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे रा.कॉ.चे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ कोळगाव येथे आयोजित सभेत केली.यावेळी जोरदार हल्ला करताना ते म्हणाले की,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जुलै २०१७ मध्ये पाणी पळविण्यासंबंधीच्या कराराची केलेली कागदपत्रे आपले सरकार आल्यावर आपण फाडून टाकू. त्यांनी आपल्या पाऊण तासाच्या भाषणात पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून आले.  विधानसभचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी भाषणात  आपले पाणी गुजरातला जातेय यावरुन नारपारचा केलेला नामोल्लेख व माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनीदेखील भुजबळ  आपण नारपारचे नेतृत्व करा, आम्ही आपल्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार आहोत, प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल असे भावनिक आवाहन केले. हाच मुद्दा पकडत भुजबळ यांनी या भागातील केळी बागायत नष्ट होत चालल्याची खंत व्यक्त करीत, जलसंपदामंत्र्यांनी एवढे काम केले असते तर शेतकऱ्यांनी दुवा दिली असती असे सांगत तापीचे अजूनही १०० टीएमसी पाणी गुजरातला जातेय ते सत्तेत आल्यावर अडविण्याची ग्वाही दिली.  भुजबळांनी वाचला पाचचा पाढा  भुजबळांनी मोदी सरकारचे अपयश पाच अंकात मांडले. पाच स्मार्ट सिटी दाखवा, जिल्ह्यात पाच गावात शौचालये व हॉस्पिटल्स दाखवा, पाच राज्यात १००० कि.मी.रस्ते दाखवा, पाच स्वच्छ राज्ये, पाच राज्यातील विजनीर्मिती दाखवा, शेजारच्या पाच देशातुन गुंतवणूक दाखवा, पाच कि.मी.गंगा स्वच्छ झाल्याचे दाखवा असे म्हणत जुमलेबाज सरकार असल्याची टीका केली.व्यासपिठावर अरुणभाई गुजराथी, वसंतराव मोरे, डॉ.सतीश पाटील,  गुलाबराव देवकर, रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख, गफ्फार मलिक, प्रदीप पवार, दत्तात्रय पवार, शशीकांत साळुंखे, संजय वाघ, संजय गरुड, ज्ञानेश्वर महाजन, अ‍ॅड. विश्वास भोसले, तिलोत्तमा पाटील, प्रमोद पाटील, राघेश्याम चौधरी, संतोष महाजन, शालीग्राम मालकर, योजना पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Politicsराजकारण