शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी असून सिंचनाची समस्या : बंधारे ठरताहेत निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 21:17 IST

  अमळनेर : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होत नसून फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी ...

 

अमळनेर : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होत नसून फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी होत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.दरवर्षी अत्यल्प होणाºया पावसामुळे पावसाच्या पाण्याचे सिंचन व्हावे यासाठी ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’सारख्या मोहिमांमध्ये शासन दरवर्षी निधीची तरतूद करते. पण अनेक ठिकाणी झालेल्या निकृष्ट कामांमुळे जलसिंचन होत नसल्याचे वास्तव विविध घटनांतून समोर येत आहे.बंधारा पाट्यांविनामारवड शिवारात धानोरा गावाजवळ माळण नदीवर लघुसिंचन विभागातर्फे बंधारा बांधून दोन ते तीन वर्षे झाली. मात्र अद्याप त्या ठिकाणी पाट्या टाकण्यात आलेल्या नाहीत. नाल्यातून पाणी वाहून जात असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. ज्या उद्देशाने बंधारे बांधण्यात आले आहेत तो साध्य होताना दिसत नाही, असा सूर शेतकरीवर्गातून ऐकायला मिळत आहे.पहिल्याच पावसात गळतीकळमसरे परिसरात यावर्षी भूजल सर्वेक्षण अंतर्गत लघुसिंचन विभागामार्फत सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसाचे पाणी अडविले गेले नाही. त्यामुळे येथील शेतकºयांनी संताप व्यक्त केला असून, तत्काळ दुरुस्तीसह दोषींवर कारवाईची मागणीही केली आहे. शासनाने मंजूर केलेल्या सिमेंट बंधाºयाचे निकृष्ट बांधकाम करण्यात आल्याने पाणी अडविले गेलेच नाही, उलट त्यास गळती लागली आहे. बारदान व मातीचा लेपपावसाळा सुरू होताच पडलेले पाणी बंधाºयाखालून वाहून गेल्याने शेतकºयांनी संबंधित ठेकेदाराविरुद्ध तक्रार केली. तेव्हा ठेकेदाराकडून गळती होत असलेल्या बंधाºयाला माती टाकून व बारदान लावून दगडांचा भराव टाकला. पण त्याचा काहीच उपयोग होणार नसल्याचे आळखून शेतकºयांनी त्यास विरोध केला. तसेच गळती होत असलेल्या भागाजवळ सिमेंटमिश्रित खडी, रेती टाकण्याची मागणी केली होती. परंतु संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी डोळेझाक केली. त्यामुळे निकृष्ट काम होऊन पाणीच अडविले गेले नाही. सरकारी निधीचा अपव्यय केला म्हणून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी कळमसरे येथील शेतकºयांनी केली आहे.