शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर पाणी

By admin | Updated: October 16, 2015 00:43 IST

महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला संधी मिळावी यासाठी भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले. पण खान्देश विकास आघाडीच्या शिलेदारांनी या फोडाफोडीवर पाणी फिरविले.

जळगाव : महापालिकेत महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला संधी मिळावी यासाठी भाजपाकडून बुधवारी मध्यरात्रीपासून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले. पण मेहरूणमधील खान्देश विकास आघाडीच्या शिलेदारांनी या फोडाफोडीवर पाणी फिरविले.

या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचाच महिला व बाल कल्याण समिती सभापती होईल असा शब्द भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना दिला होता. पण या समितीमध्ये राष्ट्रवादी व भाजपा मिळून फक्त तीन सदस्य होते. तर मनसे व खान्देश विकास आघाडीचे (खाविआ) मिळून सहा सदस्य आहेत. यामुळे फोडाफोडी केल्याशिवाय भाजपासमोर पर्याय नव्हता.

वरिष्ठ नेत्याकडून प्रय}

आपण समर्थन दिलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करावे यासाठी खाविआच्या दोन नगरसेवकांना भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने फोन केले. तसेच भाजपाचे लोकप्रतिनिधी या नगरसेवकांना बुधवारी रात्री वैयक्तिक भेटूनही आले.

खाविआने खिंड लढविली

समोरून फोडाफोडीचे राजकारण प्रतिष्ठेचे झाले होते. दुस:या बाजूला खाविआच्या नगरसेवकांनी खिंड लढविली. ज्यांना भाजपाने गळ घातला होता त्यांनी नकार दिल्याने भाजपाचे प्रयत्न अपयशी ठरले.

बैठकांचा धडाका

राष्ट्रवादी व भाजपाच्या बैठका एका शासकीय विश्रामगृहात सुरू होत्या. तर खाविआचे नगरसेवक शहरातील एका लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी एकत्र आले होते. सकाळी 11 वाजेर्पयत या बैठका सुरू होत्या.

एक नगरसेवक गळाला

भाजपाने एका नगरसेवकाला आपल्या बाजूने खेचले . पण तसे करूनही बाल कल्याण समितीमध्ये संख्याबळाचा खेळ जुळला नाही. मतदान झाले तर आपटी बसेल व नाचक्की होईल या भीतीने शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शोभा बारी यांनी माघार घेतली.