शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामावर पाणी मारत असताना तिसºया मजल्यावरुन पडून वॉचमनचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 17:34 IST

मालकांनी मात्र इमारतीवरुन पडल्याचा आरोप फेटाळल

ठळक मुद्देविवेकानंद नगरात घडली घटना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालावकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. आर.आर.महाजन यांच्या मालकीचे बांधकाम

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२३ : बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारत असताना पाय घसरुन तिसºया मजल्यावरुन कोसळल्याने राजेंद्र सिताराम गोपाळ (वय ४५ रा.वावडदा, ता.जळगाव) या वॉचमनचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता विवेकानंद नगरात घडली. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. आर.आर.महाजन यांच्या मालकीचे हे बांधकाम आहे. दरम्यान, अ‍ॅड.महाजन यांनी मात्र गोपाळ हे इमारतीवरुन पडल्याचा आरोप फेटाळून लावत ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. 

याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, सिंधी कॉलनी रस्त्याला लागून असलेल्या विवेकांनद नगरात माजी नगरसेवक अरुण शिरसाळे यांच्या घराशेजारी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. आर.आर.महाजन यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी राजेंद्र गोपाळ हे वाचमन म्हणून कामाला आहेत.इमारतीच्याच तळमजल्यात पत्र्याचे शेड करुन गोपाळ हे पत्नी बेबाबाई व मोठा मुलगा आनंद यांच्यासह वास्तव्याला होते. शनिवारी सकाळी तिसºया मजल्यावर पाणी मारत असताना त्यांचा पाय घसरला व ते थेट खाली कोसळले. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पत्नी व मजुरांनी घेतली धावराजेंद्र गोपाळ हे इमारतीवरुन कोसळल्याचे लक्षात आल्यानंतर तेथे तळमजल्यावर जेवणाला बसलेल्या दीपक वसंत गोपाळ व गोकुळ सुभाष गोपाळ (दोन्ही रा.वावडदा) या मजुरांनी धाव घेऊन त्यांची पत्नी बेबाबाई यांना बोलावले. गल्लीतील तरुणांच्या मदतीने राजेंद्र यांना जिल्हा रुग्णालयात हलविले.तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषीत केले.