शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शेती अवजारांनी फुलला वरखेडीचा बाजार

By admin | Updated: May 18, 2017 16:45 IST

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे गुरुवारी आठवडे बाजारात मोठय़ा प्रमाणात शेती अवजारांची खरेदी झाली

ऑनलाइन लोकमतवरखेडी, जि. जळगाव, दि. 18 - खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने  खान्देशात बळीराजाची लगबग सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून शेती अवजारे खरेदीलाही वेग आला असून पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे गुरुवारी  आठवडे बाजारात मोठय़ा प्रमाणात शेती अवजारांची खरेदी झाली. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेती कामांना वेग येत असतो. त्याप्रमाणे खान्देशात शेतक:यांची शेती मशागतीची कामे संपत आली आहे. अनेक ठिकाणी पेरणीसाठी शेत तयार  झाली आहेत. शेत तयार झाल्याने आता लागवडीचे साहित्य खरेदीकडे बळीराजाचा कल आहे. त्यासाठी ग्रामीण भागात लोहार बांधवांकडून अवजारे तयार करून घेतली जात आहे तर अनेक ठिकाणी बाजारात तयार अवजारे येत आहे.अशाच प्रकारे गुरुवारी पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील आठवडे बाजार शेती अवजारांनी फुलला होता.  वरखेडी येथील आठवडे बाजार भाजीपाल्यासह सर्वच वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. येथे आजूबाजूचे खरेदीदार जसे येतात त्याच प्रमाणे शेजारील जिल्ह्यातील विक्रेतेही येतात. सध्या खरीप हंगाम तोंडावर असल्याने या बाजारात शेती मशागतीचे अवजारेही मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी आली होती. परिसरातील शेतक:यांनी आज बाजारात गर्दी करीत या अवजारांची  वेगवेगळ्य़ा ठिकाणी पाहणी करून  खरेदी केली.   सध्या उष्णतेमुळे पूर्वहंगामी कापूस लागवड खोळंबल्याचे चित्र आहे. असे असले तरी शेतकरी खरीप हंगामासाठी संपूर्ण तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे.