शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारीत दिंडी प्रतिनिधी स्वरूपात वारकऱ्यांना प्रवेश मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 10:49 IST

आषाढी वारी दिंडीत प्रतिनिधी म्हणून वारकऱ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे.

ठळक मुद्देवारकऱ्यांच्या भावना आणि परंपरा यांचा आदर करावावारकरी मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची मागणी

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : आषाढी वारीत दिंडी प्रतिनिधी स्वरूपात वारकऱ्यांना प्रवेश मिळावा, अशी मागणी दिगंबर महाराज वारकरी पंढरपूर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे (फैजपूर) यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वारकरी संप्रदायाचे आराध्यदैवत श्री पांडुरंगाची आषाढी वारी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी भरत असते. अनेक पिढ्यानपिढ्या पायी दिंडीच्या माध्यमातून लाखो वारकरी पायी चालत भक्तीसुखाचा आनंद घेत पंढरपूर येथे येऊन ही उपासना व साधना परंपरा जोपासली आहे. यावर्षी कोरोना रोगाचा प्रसार व महामारीचे आलेले संकट लक्षात घेता व जनहितार्थ गर्दी होऊ नये म्हणून नेहमीप्रमाणे वारी भरणे अश्यक्य वाटत आहे. परंतु वारी परंपरा जोपासणे व आपली साधना खंडित न होता अखंडित राहणे हेसुद्धा संप्रदायाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. याकरिता शासनाने मध्यम मार्ग काढून द्यावा. केवळ पायी दिंडीचे परंपरेचे प्रत्येकी १० प्रतिनिधी यांना आषाढ शु. चतुर्थी ते पौर्णिमा या दहा दिवसांच्या वारीच्या कालावधीत वेळ दिवस निश्चित करून द्यावा. त्यावेळेत वारकरी पंढरपूर येथे आपापल्या वाहनाने जाऊन सर्वांच्या वतीने वारी करून येतील. याबाबत जिल्हावार नियोजन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रीतसर सर्व अटी शर्तीची पूर्तता करून परवानगी द्यावी. वारकरी प्रशासनाचे सर्व नियम पाळतील. दहा दिवस व प्रत्येक दिवसात सोळा तास या नियोजनानुसार पंढरपूर येथे कोणतीही गर्दी होणार नाही. शासनाने वारकरी समुदायाच्या भावनांचा व परंपरांचा आदर राखून तत्काळ नियोजन जाहीर करावे व रीतसर परवानगी मिळावी, अशी विनंती दिगंबर महाराज वारकरी पंढरपूर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी केली आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमFaizpurफैजपूर