शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

वाकडी ग्रा.पं. सदस्य खूनप्रकरणी पाचव्या आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:52 IST

डांभुर्णीतील तरुणाच्या शोधासाठी पथके रवाना

पहूर, ता. जामनेर : वाकडी, ता. जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांच्या प्रकरणी पाचवा आरोपी निष्पन्न झाला असून प्रदीप परदेशी (रा. डांभुर्णी, ता. पाचोरा) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचील मुख्य संशयित माजी सरपंच चंद्रशेखर वाणी याला पोलिसांनी शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अन्य तीन जण पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून डांभूर्णी येथील युवकाचे नाव पोलीस तपासात समोर आले आहे.कोठडीतील तिघांनी दिली पाचव्या आरोपीची माहितीविनोद चांदणे यांचे अपहरण करून खून झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी मुख्य संशयित चंद्रशेखर वाणी याला पंढपूर येथून गुरुवारी अटक केली. पहूर पोलिसांनी विनोद खून प्रकरणी वाणीला विचारपूस केली असतामी काहीही केले नसून मला याबाबत काही माहिती नाही, असे उत्तर वाणी याने दिले. दरम्यान, या पूर्वीच अटक करण्यात आलेल्या व पोलीस कोठडीत असलेल्या तिघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता यात डांभुर्णी येथील प्रदीप परदेशी याचेही नाव पुढे आले.डांभुर्णीच्या दिशेने तपासपाचोरा तालुक्यातील पिंप्री गावाजवळील डांभूर्णी येथील प्रदीप परदेशी याचे नाव पुढे आल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधार परदेशी असून त्यानेच विनोदचा घातपात करून मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाले आहे. त्याला अटक झाल्यानंतर खुनाचे रहस्य उघडकीस येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रदीपचा सहभाग कसा आला असा प्रश्न पोलिसांपुढे आहे. प्रदीप याची गावात दहशत असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रदीपच्या भावाची डीवाय.एसपी केशवराव पातोंड यांनी चौकशी केली.घटनेत वापरलेला लोखंडी रॉड जप्तपोलीस कोठडीत असलेल्या महेंद्र राजपूत याने यापूर्वी दिलेल्या कबुली जबाबावरून विनोदच्या डोक्यावर रॉड मारल्याचे सांगितले होते. आता प्रदीपने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे राजपूत याने पोलिसांना सांगितले. महेंद्रने घटनेत वापरलेला लोखंडी रॉड पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेल्या घटनांच्या आधारे वाढीव कलमे लागणार असून नेमके कितीजण या कटात सहभागी आहेत हे तपासानंतर समोर येईल. विनोदला वाकडी धरणाजवळ मारहाण करताना काही जणांनी पाहिले, मात्र भीतीपोटी माहिती देण्यास कोणी समोर येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. महेंद्र राजपूत हा सराईत गुन्हेगार असून वेळोवेळी कबुलीची भाषा बदलवित असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव