शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीला ‘वाघूर’चे पाणी

By admin | Updated: March 30, 2017 00:02 IST

१ पासून प्रारंभ : प्रादेशिक कार्यालयाचा ठराव

जळगाव : औद्योगिक वसाहत परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी स्थलांतरीत करण्यात येणार असल्याने हे काम होईपर्यंत एमआयडीसीला १ एप्रिलपासून मनपाकडून वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा निर्णय बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान,  एमआयडीसीला दुषीत पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीनंतर भुसावळ न.प. व रेल्वे विभागाला उपाय योजनाबाबत सूचना देण्यात आल्या. बुधवारी  जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक झाली. एमआयडीसीला तापी नदीतून पाणीपुरवठा होत असल्याने तो दुषीत असल्याची तक्रार गेल्या वेळच्या बैठकीत उद्योजकांनी केली होती. भुसावळ न.प. व रेल्वे विभागाकडून सांडपाणी तापी नदीपात्रात  सोडले जाते. त्यासंदर्भात आज बैठकीत चर्चा होऊन भुसावळ न.प. व रेल्वे विभागाच्या अधिकाºयांना उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या. मनपाकडून दररोज ६ एमएलडी पाणीभुसावळ येथून महामार्गाच्या बाजूने जलवाहिनीद्वारे जळगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. महामार्गाच्या कामामुळे ही जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे एमआयडीसीला पाणी पुरवठ्याची अडचण येऊ नये म्हणून जळगाव महापालिकेकडून वाघूर धरणातून दररोज सहा  एमएलडी पाणी पुरविले जाणार आहे. याची १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. तीन महिन्यापर्यंत पाणी दिले जाईल. प्रादेशिक कार्यालय जळगावात एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाला ८५ टक्के महसूल जळगावातील उद्योगांकडून मिळतो. असे असले तरी हे कार्यालय धुळे येथे आहे.  जळगावातील  उद्योजकांना धुळे येथे जावे लागते. त्यामुळे जास्त महसूल देणाºया उद्योजकांची संख्या जळगावात असल्याने   जळगावात प्रादेशिक कार्यालय असावे असा या बैठकीत ठराव करण्यात आला.  घातले आहेत.  मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांच्यासह महसूल, महावितरण, रेल्वे, भुसावळ न.प., एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.